राॅयुका भंडारा जिल्हा सचिव पदी चेतन बांडेबुचे यांची निवड
नरेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी,भंडारा
भंडारा : खासदार शरदचंद्र पवार,खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली पुढील काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या विकासात भरीव कार्य व पक्ष संघटनेत शिस्तबद्ध पद्धतीने नियोजनबद्ध कार्य करण्याची जबाबदारी आपल्यावर देण्यात येत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे भंडारा-गोंदिया जिल्हयाचे माजी खासदार मधुकर कुकडे, भंडारा जिल्हयाचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश, सुनिल फुंडे प्रदेश प्रतिनिधी व रा. यु. का. जिल्हाध्यक्ष यशवंत श्रीराम सोनकुसरे यांच्या नेतृत्वखाली लाखनी तालूक्यातील पेंढरी (पोहरा)येथील सामाजिक कार्यकर्ता
चेतन अण्णाजी बांडेबुचे यांची रा. यु. का.सचिव भंडारा जिल्हा या पदावर नियुक्ती करण्यात आली. निवडीबद्दल अनेक चाहते व मिञ मंडळी यांनी अभिनंदन केले.