विरई येथील सरपंच,श्री.भास्कर उर्फ(प्रदीप) वाढई यांचे निधन.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : विरई येथील माळी समाजाचे सक्रिय कार्यकर्ते कर्तव्यदक्ष सर्व सामान्य जनतेच्या कामात व्यस्त राहणारे सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांशी, पदाधिकाऱ्यांशी,कार्यकर्त्यांशी सलोख्याचे संबंध ठेवणारे विरई ग्राम पंचायतीचा विकास हाच आपला ध्येय ठेऊन काम करणारे विद्यमान होतकरू सरपंच श्री.भास्कर उर्फ(प्रदीप) वाढई यांचे दिनांक २१/६/२०२३ रोजी दुपारी ३-०० वाजता निधन झाले.
मागील एक वर्षापासून कॅन्सरच्या आजाराने उपचार घेत होते. त्यांची तब्बेतही सुधारत होती. परंतु आज अचानक दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे मागे पत्नी,एक मुलगा,मुलगी असा आप्त परिवार आहे. उदयाला विरई नदीपात्रात सकाळी ११-०० वाजताच्या दरम्यान त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
स्व.प्रदीप वाढई यांना समस्त माळी समाज बांधवांतर्फे तसेच मुल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली...💐💐💐