करण लुटे ठरले बेस्ट डायरेक्टर पुरस्काराचे मानकरी.
नरेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी,भंडारा
भंडारा : नुकत्याच चर्चेत असलेल्या भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील रेंगोळा या गावातील चोवीस वर्षीय करण लुटे यांचा लघुचित्रपट सध्या जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. करण लुटे यांनी आपल्या ग्रामीण भागातील कलावंतांना घेऊन भुताचं झाड हे लघुचित्रपट स्वतः लेखन आणि दिग्दर्शन करून तयार केले आहे.
करण लुटे यांनी औंरंगाबादमधील रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये सहभाग घेतला होता आणि त्यात सर्वोत्कृष्ट मराठी लघुचित्रपट या पुरस्काराने करण लुटे यांच भुताचं झाड हे लघुचित्रपट सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे सिनेमास्कोप इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये बेस्ट डायरेक्टर या पुरस्काराने गौरविण्यात आले. आणखी बऱ्याच ठिकाणी करण लुटे यांच्या भुताचं झाड या लघुचित्रपटाने नॅशनल आणि इंटर नॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये करण लुटेला नवी ओळख दिली आहे.
प्राप्त महितीनुसार असे निदर्शनास आले की पैशाची आर्थिक बाबी लक्षात घेऊन करण लुटे यांनी हा लघुचित्रपट तयार करतांना स्वतःचा मोबाईल सुद्धा विकला आहे. आणि मोबाईल वरूनच संपुर्ण लघुचित्रपट तयार केला आहे. करण लुटे यांनी सांगितले की परिपुर्ण साधनसामग्री आणि अनुभवी संपुर्ण कलाकार नसल्याने आमच्या या लघुचित्रपटामध्ये काही बारीक चुका झालेल्या आहेत.
त्यात आम्ही समोर सुधारणा करु.माझ्या टीममधील सर्व कलावंतांनी जीव लावून मेहनत घेतली त्यांच्या या मेहनतीमुळे आम्ही आज पुरस्काराचे मानकरी ठरलो आहे. आणि आता समोर सुद्धा आम्ही रसिकांच्या भेटीला सामाजिक राजकीय आणि कौटुंबिक शैक्षणिक आणि इतर विषयावर प्रकाश घालण्यासाठी. नवनवीन संकल्पना आम्ही समोर आणणार आहोत असा करण लुटे लेखक दिग्दर्शक यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ कैफियत प्रकट केली.