गांजा विक्रीसाठी पुण्यात गेलेल्या गडचिरोली येथील महाविद्यालयीन तरुणांना अटक.

गांजा विक्रीसाठी पुण्यात गेलेल्या गडचिरोली येथील महाविद्यालयीन तरुणांना अटक.


एस.के.24 तास


पुणे : गडचिरोली,भंडारा जिल्ह्यातून गांजा घेऊन पुणे शहरात विक्रीसाठी आलेल्या तीन महाविद्यालयीन तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने नगर रस्ता भागात पकडले.त्यांच्याकडून ११ लाख १४ हजार रुपये किमतीचा ५५ किलो गांजा,तीन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.


राम राजेश बैस वय २०, रा.रामपुरी वॉर्ड,गडचिरोली, ऋतिक कैलास टेंभुर्णे वय,२१, रा.गौराळा,ता. लाखांदूर,जि.भंडारा,निकेश पितांबर अनोले वय,२२ रा. कस्तुरबा वॉर्ड,ता. देसाईगंज,जि.गडचिरोली अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.


गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथक नगर रस्त्यावरील खराडी भागात रविवारी गस्त घालत होते. त्यावेळी तिघे जण गडचिरोलीतून गांजा घेऊन विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस हवालदार चेतन गायकवाड, रवींद्र रोकडे यांना मिळाली.या माहितीनुसार पोलिसांनी खराडी बाह्यवळण मार्गावर सापळा लावून तिघांना पकडले. त्यांच्याकडील बॅगेमध्ये पोलिसांनी ५५ किलो गांजा आणि ३ मोबाइल असा ११ लाख ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल सापडला.


अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे,उपायुक्त अमोल झेंडे,सहायक आयुक्त,सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, सहायक फौजदार शिवाजी घुले,चेतन गायकवाड,रवींद्र रोकडे,संतोष देशपांडे,संदीप जाधव आदींनी ही कारवाई केली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !