शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार. - आमदार सुधाकरराव अडबाले.
★ सविधान प्रस्ताविका अनावरण संपन्न.
एस.के.24 तास
चंदपूर : शिक्षक बांधवानी स्वपुढाकाराने विक्रमी मताधिक्याने मला विधान परिषदेत पाठविले आहे.शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदोदित पुढाकार घेणार असून,कधीही निराश करणार नाही अशी ग्वाही नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांनी दिली.
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील भारतीय संविधान प्रस्ताविका अनावरण समारंभात तेउदघाटक म्हणून बोलत होते.जिल्हयातील व्यावसायिक अभयासक्रम,औदयोगिक प्रशिक्षण संस्था व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प़शिक्षण कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयात भारतीय संविधान प्रस्ताविकेचे अनावरण करण्यात येऊन कार्यालयाचे सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी प्रमुख उपस्थीतामधे प्रभारी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री.मेहंदळे सर व कु.कल्पना खोब्रागडे उपस्थित होते.यांनी आमदार सुधाकरराव अडबाले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
आयोजन समिती तफै महेश पानसे यांनी प्रास्ताविक करताना तंत्र प्रदर्शनी आयोजनात शासनाने भरीव आर्थिक मदत करण्यासाठी आमदार महोदयानी पाठपुरावा करण्याची मागणीवजा विनंती केली. संविधान प्रास्ताविका अनावरण यामागील भूमिका स्पष्ट केली.
प्रभारी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री.मेहेंदळे सर व कु.कल्पना खोब्रागडे यांनी या औचित्य पूर्ण उपक्रमावर प्रकाश टाकला.याप्रसंगी व्यवसायिक शिक्षणातिल प्रा.गुणवंत दरवे, प्रा.धवस,प्रा.गोबाळे प्रा. शेखर जुमडे यांचे सह मुलींची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,शासकिय औदयोगिक प्रशिक्षण संस्था,तंत्रशिक्षण शाळेचे शिक्षकवृंद व शिक्षीका मोठया संख्येने उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे सुंदर संचालन व आभारमत श्री.काळे सर यांनी केले.