मॅजिक बस संस्थेच्या वतीने सावली तालुक्यातील तेरा गावांमध्ये उन्हाळी शिबिराचे आयोजन.
एस.के.24 तास
सावली : दिनांक,16 ते 26 जून 2023 दरम्यान सावली तालुक्यातील मौजा बेलगांव, निफंद्रा,पेंढरी(मक्ता),चख विरखल आणि निमगाव,डोनाळा,केरोडा,घोडेवाही,लोंढोली,साखरी, व्याहाड खुर्द,जाब बुज,जिबगाव येथे उन्हाळी शिबीराचे आयोजन मा.प्रशांत लोखंडे,वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मॅजिक बस चंद्रपूर व सावली तालुका समन्वयक आकाश गेडाम यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
शिबिराच्या माध्यमातुन सहभागी विद्यार्थ्यांन मध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा व विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये शालेय काम-काजात व्यस्त राहावेत, अशा उद्देशाने विविध विषयांवर विद्यार्थ्यांना शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. त्या मध्ये टाकाऊ वस्तू पासुन टिकाऊ वस्तू तयार करणे, जसे की प्लास्टिकच्या बॉटल्स पासुन पेन स्टँड, कुंड्या, फोटो फ्रेम, झुमर, इत्यादी. त्या सोबतच जागतिक तापमाना वाढ, समानता, शांतता, सुरक्षा इत्यादी विषयांवर जागृकता पसरविणारे पोस्टर तयार करणे. अशा विविध विषयाचां समावेश होता.
शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांना मॅजिक बस संस्थेचे शाळा सहाय्यक अधिकारी कु.श्रद्धा नागमोते व निशा उमर्गुंडावर यांनी मार्गदर्शन केले.बेलगांव,निफंद्रा, पेंढरी(मक्ता),चक विरखल,निमगाव,डोनाळा,केरोडा, घोडेवाही, लोंढोली,साखरी,व्याहाड खुर्द,जाब (बुज) जिबगाव या 13 गावांमधील 06 वी ते 08 च्या जवळपास 370 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मॅजिक बस संस्थेच्या वतीने नोटबुक, पेन आणि कॅम्पास इत्यादी शैक्षणिक वस्तू बक्षीस म्हणून देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा सहाय्यक अधिकारी कु.श्रध्दा नागमोते,व निशा उमर्गुंडावार,समुदाय समन्वयक सोनू कांबळे, सुरेन्द्र ठाकरे,साक्षी गंडाटे,अनिकेत भोयर,हर्षा ठाकरे,आकाश भोयर,प्रणाली साखरे,सुरज रायपुरे,कविता बोधलकर,प्रिया अलाम,रुपाली कांबळे, अंकिता उराडे,शितल भोयर,मिनाक्षी बोदलकर यांनी अथक परिश्रम घेतले.