प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेंटीस मेळाव्याचे भव्य आयोजन चंद्रपुरात.



प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेंटीस मेळाव्याचे भव्य आयोजन
 चंद्रपुरात.


एस.के.24 तास


चंद्रपूर : शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथील कौशल्यम सभागृहात येत्या दि. 12. 6. 2023 रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळाव्याचे भव्य आयोजन केलेले आहे. सदर मेळाव्यांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, सुझुकी मोटर गुजरात,चेतक टेक्नॉलॉजी पुणे, महेंद्र ऑटोमॅटिक पुणे  तसेच इतर नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.  शिकाऊ उमेदवारांकरिता निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार स्टायपेंड तसेच कंपनीतर्फे इतर सोयी सुविधा उपलब्ध राहतील.टर्नर, फिटर,मोटर मेकॅनिकल वेहिकल,वायरमन ,इलेक्ट्रिशियन, वेल्डर,मेकॅनिक ट्रॅक्टर ,मेकॅनिक डिझेल  तसेच एनसीवीटी मार्फत टेक्निकल ट्रेड केलेल्या सर्व उमेदवारांसाठी उपलब्ध आहे. 


पात्रता धारक उमेदवारांनी आधार कार्ड, पॅन कार्ड,व्यवसाय परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र तथा इतर प्रमाणपत्रासह दिनांक 12.6.2023 रोजी सकाळी दहा वाजता संस्थेच्या कौशल्यम  सभागृहात उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्राचार्य श्री रवींद्र मेहेंदळे तसेच बी. टी.आर. आय सेंटरच्या सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे यांनी केलेले आहे.  तसेच जास्तीत जास्त उमेदवारांनी या मेळाव्यात उपस्थिती दर्शवून या सुवर्णसंधीच्या लाभ घ्यावा असेही त्यांनी कळविले आहे

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !