चौगान येथे सेवा सहकारी संस्थेच्या वतीने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,०५/०६/२३ शेतकऱ्यांनी घेतलेले धानाचे उत्पादन त्यांना सहजपणे योग्य दरात विकता यावे यासाठी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सरकारने सुरू केलेली आहेत. त्यानुसार ब्रम्हपुरी तालुक्यातील चौगान येथील सेवा सहकारी संस्थेच्या वतीने आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, चौगान सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिवाकर मातेरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला आहे.