मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेशी चर्चा करतांना.अँड.राजेंद्र महाडोळे साहेब ★ विविध मागण्यांसंदर्भात आक्रमक भूमिका.


मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेशी चर्चा करतांना.अँड.राजेंद्र महाडोळे साहेब


 ★ विविध मागण्यांसंदर्भात आक्रमक भूमिका.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


चंद्रपूर : जिल्ह्यात तीव्र भेडसावित असणाऱ्या समस्यांच्या बाबतीत व होत असणाऱ्या अन्यायाच्या बाबतीत सर्व तालुक्यात शेतकरी शेतमजुर एल्गार परिषदेच्या वतीने तालुका निहाय निवेदने देण्यात आली.हे सर्व विषय गंभीर असल्यामुळे त्या संधर्भात वि.जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांनी अड महाडोळे साहेबाना चर्चेसाठी बोलविले सोबतच जिल्ह्यातील सर्व वनविभागाचे उच्च अधिकारी ,कृषी अधिकारी उपस्थित होते .ही चर्चा  तब्बल दीड तास  चालली या चर्चा मधे प्रामुख्याने 


1) वाघांच्या हल्ल्यात निषापाप लोक बळी पडत असल्याबाबत त्वरित नियोजन करण्याबाबत व बळी पडलेल्या कुटुंबीयांना व जखमींना नुकसान भरपाई वाढवून द्यावी. 2)  सिंचणा बाबत त्वरित विहिरी, व बोअरवेल पंप,चे नियोजन करावे.3) बेरोजगार साठी रोजगाराची सुविधा करावी व मजुसाठी तेलगणा येथे स्थलांतरित होत असलेले रहिवासी थांबवा .4) शेतकऱ्यांना 10000 रू प्रति एकरी लागवडी खर्च मिळणे. शेतकरी शेतमजूर यांना पेन्शन लागू करा. 5) अतिक्रमण धारकांना कायदेशीर पट्टे त्वरित द्यावे. 6)  एससी एसटी प्रमाणे इतरही लोकांना घरकुल त्वरित देवून घरकुल ला शहरी भागात मिळणारी रक्कम ग्रामीण भागात द्या .7) प्रत्येक गावात धान्य साठवणूक गोडावून व शीतगृह देण्यात यावी. इतर अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. 


हया शिष्ट मंडळात प्रामुख्याने नानाजी आदे,अमोल गुरनूले, राजेंद्र मांदाडे, सौ.रंजनाताई पारशिवे ,नंदू बारस्कर, मारोतराव शेंडे, ओमदेव मोहुर्ले,ईश्वर लोनबले, नासीर  खान ,वासुदेवराव गुरनूले,गुलाब शेंडे,

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !