एच.एस.सी. परीक्षेत आर्या उराडे तालुक्यातुन द्वितीय स्थानी.

एच.एस.सी. परीक्षेत आर्या उराडे तालुक्यातुन द्वितीय स्थानी.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : दिनांक,०१/०६/२३ नुकत्याच जाहीर झालेल्या एच.एस.सी. (12वी) परीक्षेच्या निकालात मुलींनी बाजी मारली असुन स्थानिक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. आर्या नितीन उराडे हीने 88.83 टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत तालुक्यातुन द्वितीय येण्याचा मान मिळवित भरघोस यश संपादन केले आहे.


आर्याचे वडील डॉ.नितीन उराडे हे शहरातील प्रसिद्ध उद्योगपती व नगरसेवक आहेत. तर आई डॉ.दर्शना उराडे ह्या नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. आर्याच्या आईवडीलांनी वेगवेगळ्या विषयात आचार्य पदवी प्राप्त केली असल्याने लहानपणापासूनच आर्याच्या कुटुंबात शैक्षणिक वातावरण होते. त्यामुळे हे यश संपादन करता आल्याचे यावेळी आर्याने सांगितले आहे.

तिने आपल्या यशाचे श्रेय डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य देवेश कांबळे, सर्व प्राध्यापकवृंद, आई, वडील यांना दिले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !