ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी.

ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती  साजरी.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


नागभीड : ग्रामपंचायत नवेगाव पांडव ही अनेकविध नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात सर्वदूर विख्यात आहे. उपक्रमाच्या मालिकेत आणखी एक उपक्रम म्हणजे पुन्यश्लोक अहील्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या निमि्ताने गावांतील मुलींनी पथनाट्य,लावणी,भाषणं दिली.

नवेगांव पांडव येथे दारूबंदी समीतीच्या स्त्रीयांनी दारूबंदी करूण अशी मोलाची कामगिरी बजावली होती.हे अँड शर्मिला रतनकुमार रामटेके सरपंचा नवेगाव पांडव यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले. अडचणी ह्या एखादी लांडग्याप्रमाणे असतात,त्यांना घाबरायचे नसते ज्याप्रमाणे महापुरुष स्त्रियांनी संघर्षमय जीवन व्यतीत केले तसे जीवन व्यतीत करावे. 

स्री सामोरे जाताना मानवी लांडगे बघू शकत नाही मग ते स्त्रीयांच्या चारित्र्यावर बोट ठेवाण्याचे प्रयत्न करतात.तीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो  पण मागे जाऊ नये  संघर्ष कायम ठेवावा असा संदेश दिला.

कार्यक्रम निमित्त ह्या दारूबंदी समीतीच्या अध्यक्ष, सुनिता व्यंकटेश बोरकुटे यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ,चषक मेडल व पाचशे रुपये चा चेक व संपूर्ण दारूबंदी समीतच्या स्त्रीयांना मेडल देऊन गौरविण्यात आले.गुरूकुल गुरूदेव सेवा मंडळ ची सेवा करणारे कुंदा वामण बोरकुटे व नेहमी गावांची स्वच्छता व ग्रामपंचायत चे कोणतेही काम विशेष सहकार्य करतात अशा सारजाबाई धोंडु बावणे यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ चषक मेडल पाचशे रुपये देऊन गौरविण्यात आले.


मुलीना,अंगणवाडी सेविका मदतनीस,आशाताई, आरोग्य केंद्र कर्मचारी यांना सुध्दा मेडल  देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे मार्गदर्शक शिक्षण गट विकास अधिकारी पंचायत समिती नागभिड चे भंडारे मॅडम यांनी आपल्या भाषणात म्हणाले की स्त्री ही पुरुषापेक्षा कमी नाही, तीस वर्षे राजमाता अहील्यादेवी राजकारभार कसा चालविला यावर प्रकाश टाकला.


यावेळी जि.प.प्रा.शाळा नवेगाव पांंडवचे मेश्राम मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शक केले.अहील्याबाई होळकर चा संपूर्ण इतिहास सांगितला.जयंतीच्या निमित्ताने , डॉ.प्रशांत पांडव,पांढुरंग रामटेके,सदस्य सौ कल्पना सुरेश नवघडे,सौ मिराताई मशाखेत्री,निरंजना शंकर सोनटक्के,सौ.मालती केवळ तिजारे,बनकर साहेब, खोब्रागडे सिस्टर,स्त्रियां मुलीमुले मोठ्या प्रमाणात नागरीक उपस्थित होते. 

कार्यक्रमांचे संचालन कु.तनिष्का सोनटक्के यांनी केले तर आभार नंदीनी रडके हिने केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विजय श्रीराम नवघडे,अतुल दादाजी पांडव यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !