एस.के.24 तास
नागभीड : योग विद्या ही भारत देशाने जगाला दिलेली देणगी आहे. 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महा सभेची परवानगी मिळाल्यानंतर 21 जून हा दिवस प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात साजरा केला जातो.
याच आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून नेवजाबाई हितकारिणी विद्यालय नवेगाव पांडव येथे सकाळच्या प्रहरात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्या निमित्त प्रमुख अतिथी म्हणून नवेगाव पांडव चे सरपंचा अँड.सौ शर्मिला रतनकुमार रामटेके ह्या उपस्थित होत्या.यांचे हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आले . या निमीत्ताने आरोग्यासाठी योग हे फारच महत्वपूर्ण आहे असे उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी योग दिवसाबद्दल मोलाचे मार्गर्शन केले.
तसेच ने.ही विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री चु-हे सर यांनी 4 ते 5 दिवसांपासून विद्यार्थ्यांना विविध योगासने शिकवली .आणिआज दिनांक 21/6/2023 आंतरराष्ट्रीय दिनी विविध योगासनाचे महत्व शाळकरी विद्यार्थ्यांना पटवून दिले.आणि योगासन शारिरीक दृष्ट्या का महत्वाचे आहे हे सुद्धा खुप छान पद्धतीने पटवून दिले प्रत्येक व्यक्ती ने 10 ते 15 मिनिटे स्वतःला द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.या निमित्ताने विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी व एन.सी.सी.चे कॅडेट उपस्थीत होते.व शाळेतील विद्यार्थी सुध्दा उपस्थित होते.