भंडारा येथे वंचित बहुजन आघाडीची सभा.
नरेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी,भंडारा
भंडारा : वंचित बहुजन आघाडी जिल्ह्यात वाटचाल अतिशय चांगली असून ठिकठिकाणी निवेदन सुरू आहेत लोकांचे प्रश्न उचलले जात आहेत परंतु एवढं करून चालणार नाही त्यासाठी बूथ बांधणी, संघटन कौशल्य वाढवणे आवश्यक आहे जोपर्यंत बूथ पातळीवरील बूथ बांधणी होणार नाही तोपर्यंत मोठ्या प्रमाणात संघटन शक्ती उभी होणार नाही.
आणि येणारे विधानसभा ते नगरपरिषद निवडणूक मध्ये आपले उमेदवार निवडून येणार नाही त्या दृष्टिकोनातून बुथ बांधणी व संघटन शक्ती वाढवावी असे मत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले यांनी भंडारा येथील विश्रामगृह येथे सभेतआपले मत प्रकट केले. याप्रसंगी पूर्व विदर्भ सयोजक के ए. नांन्हे, भंडारा गोंदिया निरीक्षक भगवान भोंडे,महिला निरीक्षक सुनिता टेंभुर्ण, जिल्हा महासचिव दिलीप वानखेडे ,जिल्हा संघटक डी जी रंगारी युवा अध्यक्ष दिपक जंनबंधू, इत्यादी.
मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते भगवान भोंडे यांनी सांगितले की पक्षाची जी चळवळ आहे ते खालच्या स्तरापर्यंत पोहोचली पाहिजे मतदारापर्यंत पोहोचली पाहिजे असे मत व्यक्त केले त्याचप्रमाणे भंडारा जिल्हा संघटक डी जी रंगारी यांनी खुलताबाद येथे तीन दिवसीय राज्यस्तरीय कृती प्रशिक्षण शिबिराचा त्या सभेत अहवाल सादर केला.
त्याचप्रमाणे भगवान भोंडे,धनपाल गडपाले यांनी सुद्धा अहवाल सादर केला विविध विषयावर चर्चा झाली त्यामध्ये राज्यस्तरीय तीन दिवशी प्रशिक्षण शिबीर अहवाल,नरलीमध्ये मुस्लिम युवकांच्या पोलीस कस्तडी मध्ये मृत्यू ,आपल्या जिल्ह्यातील गायरान जमीन धारकांची माहिती संकलित करणे,नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीविषयी चर्चा,प्रबुद्ध भारत नोंदणी , सदस्य मोहीम अभियान व अध्यक्षाच्या परवानगीने आलेले विषय या विषयावर सभेमध्ये चर्चा करण्यात आली तसेच पूर्व विदर्भ संयोजक के ए नांहे, महिला निरीक्षक सुनिता टेंभुर्णे,युवा अध्यक्ष दिपक जंनबंधू यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक दिलीप वानखेडे यांनी केले तर सचींव आभार अमित वैद्य यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सुरेश खंगार,चरणदास मेश्राम,तनुजा नागदेवे,राम चंद्रशेखर,अमित नागदेवे यादवराव गणवीर,अँड,सुजता वाल्देकर,गणेश गजभिये, साधना लाडे, देवानंद वांल्देकर,सीमा बडोले ,रामचंद्र काणेकर ,जनार्दन बावणे, अशोक मेश्राम, रामटेके, असे बहुसंख्य कार्यकर्ते याप्रसंगी बैठकीला उपस्थित होते.