पारडी येथे खरीप हंगाम पुर्व प्रशिक्षण संपन्न.

पारडी येथे खरीप हंगाम  पुर्व प्रशिक्षण संपन्न.


नरेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी,भंडारा


भंडारा : दिनांक 22/6/2023 ला मौजा पारडी ,तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व कृषी विभाग लाखांदूर अंतर्गत खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण अायोजित करण्यात आला . सदर कार्यक्रमात  किशोर पात्रीकर उपविभागीय कृषी अधिकारी साकोली यांनी शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. ग्रामीण रोजगार व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत सलग फळबाग लागवड व pmksy ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्याविषयी आवाहन केले. 

भाजीपाला लागवड,मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत वैयक्तिक शेततळे, हिरवळीचे खत , अझोलाचा भात शेतीमध्ये वापर तसेच जनावरांसाठी खाद्य म्हणून वापर, भात व भाजीपाला पीक उत्पादन वाढीचे सूत्र तसेच PM Kisan ekyc करून घेण्याचे सांगितले.प्रमुख उपस्थितीत खोलमारा गावचे प्रगतशील शेतकरी अमृतजी मदनकर यांनी भाजीपाला कारली पिकाविषयी  मनोगत व्यक्त केले.


अनिल जवंजार सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना तसेच बियाणे खरेदी करते वेळेस घ्यावयाची काळजी तसेच प्रत्यक्ष कृतीद्वारे तीन टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया व उगवण क्षमता चाचणी करून दाखवले.सचिन गजभिये कृषी सहाय्यक यांनी दशपर्णी अर्क जीवामृत निंबोळी अर्क बाबत मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मानबिंदू दहिवले सामाजिक कार्यकर्ता उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत संतोष नागलवाडे कृषी पर्यवेक्षक उपस्थित होते तसेच गावचे सरपंच शिवशंकर चौव्हारे तसेच उपसरपंच गीता ताई शहारे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत मेश्राम , अरविंद रामटेके तसेच पोलीस पाटील हुकरे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यास मानबिंदू दहिवले सामाजिक कार्यकर्ता यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला गावातील महिला व पुरुष उपस्थित होते.


यावेळी प.स.सदस्य,अनिल किरणापुरे, FPO संचालक  खोटेले, कृषी पर्यवेक्षक सपाटे व नागलवाडे,BTM रजनी,तथा कृषी सहायक व शेतकरी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !