आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कडून वांद्रा येथील निराधार महीलेला आर्थिक मदत.

आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कडून वांद्रा येथील निराधार महीलेला आर्थिक मदत.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : दिनांक,१०/०६/२३ ब्रम्हपुरी तालुक्यातील वांद्रा येथील रहिवासी असलेले हेमराज देविदास ठाकरे वय,35 वर्ष हे तेंदुपत्ता च्या कामावर छत्तीसगड राज्यातील अंबिकापुर येथे गेले होते. तेव्हा अचानक त्यांची तेथे प्रकृती खराब झाली. त्यानंतर त्यांना तेथील स्थानिक रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


ते घरातील कर्ता पुरुष होते.त्यामुळे त्यांच्या जाण्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले असुन उदरनिर्वाहासाठी त्यांच्या पत्नीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.या बाबतची माहिती वांद्रा येथील ग्राम काॅंग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री,आमदार,विजय वडेट्टीवार यांना कळवताच त्यांनी तात्काळ सदर महीलेला आर्थिक मदत दिली.व यापुढेही आपल्या कुटुंबियांची पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहणार असा विश्वास देखील यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपदग्रस्त महीलेला दिला.


यावेळी आर्थिक मदत देतांना माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे,नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, बाजार समितीचे संचालक किशोर राऊत,उपसरपंच गुरुदेव वाघरे,यशवंत राऊत, दयाराम राऊत,यशवंत देशमुख, ग्रा.पं.सदस्य सर्वश्री लोमेश गेडाम,वनिताताई मेश्राम,ताराबाई कामडी,प्रमोद सातपुते, कविताताई पाल, अंजलीताई राऊत यांसह अन्य नागरिक उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !