आमदार राजू मानिकराव कारेमोरे यांच्या हस्ते वरठी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव.
नरेंद्र मेश्राम - भंडारा
भंंडारा : इयत्ता १० वी व १२ वी परिक्षेत प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार राजू मानिकराव कारेमोरे यांच्या शुभहस्ते शिल्ड, प्रमाणपत्र व पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित समाज सेविका.रंजीताताई राजू कारेमोरे,मोहाड़ी पंचायत समिती चे सभापती रितेश वासनिक,तसेच गट शिक्षण अधिकारी मनीषा गजभिये,मोहाड़ी येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास मेश्राम,
लोकमत चे पत्रकार तथागत मेश्राम,अरविंद येळणे,माजी पं.स.सदस्या आकांक्षा वासनिक,माजी ग्रा.पं.सदस्य अतुल भोवते,चेतन डांगरे,रवि बोरकर, कैलास बंसोड, पंढरीनाथ झंझाड़,अमित सुखदेवे, दिनेश कुकडे,कैलास तीतीरमारे, राजू केवट उपस्थित होते. १० वी चा निकाल ९५.२८ व १२ वी चा निकाल ९० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी असेच यश मिळवून शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल करावे.
एक चांगला भारतीय नागरिक म्हणून देशगौरव वाढवावा असे मार्गदर्शन आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी केले.या गुण गौरव सोहळा कार्यक्रमा मंध्ये विद्यार्थी,पालक, आई, वडील आणि आशा सेविका, आंगनवाड़ी सेविका सुद्धा उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती कैलाश तितिरमारे यांनी केले तर ,आभार प्रदर्शन माजी सरपंच श्वेता अरविंद येळणे यांनी केले.