परिस्थितीचा बाऊ न करता शिक्षणाला समाज परिवर्तनाचा माध्यम बनवा. - करण वाल्मीक दोडके

परिस्थितीचा बाऊ न करता शिक्षणाला समाज परिवर्तनाचा माध्यम बनवा. - करण वाल्मीक दोडके


एस.के.24 तास


सिंदेवाही : शिक्षण हे  फक्त बक्कळ पैसा कमावून श्रीमंत होण्यासाठी नसून शिक्षणाला समाज परिवर्तनाचा माध्यम बनवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करता नामांकित संस्थांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे, असे मत नुकतीच आयआयटी हैदराबाद येथे निवड झालेल्या करण दोडके यांनी व्यक्त केले. 

दिनांक 5 मे 2023 रोजी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना सिंदेवाहीद्वारा आयोजित जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित सत्कार समारंभ व वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. यावेळी संतोषजी चौके, सरपंच सुषमा धारणे, उपसरपंच नरेंद्रजी मगरे, सामाजिक कार्यकर्ते जीवनदास भरडे, वाल्मिकी दोडके, शालिकजी गरमडे,  शोभाताई दांडेकर, पवन दांडेकर, किशोरजी बारेकर, विद्यार्थी संघटनेचे  सल्लागार तथा अंकुर गुरू विवेकानंद चौखे, तालुका अध्यक्ष धीरज दांडेकर, तालुका सचिव हितेश चौधरी, प्रसिद्धीप्रमुख अमोल ननावरे, सदस्य विष्णू घोडमारे उपस्थित होते.

या कार्यक्रमांमध्ये  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबाद येथे निवड झालेल्या करण दोडके यांचा विद्यार्थी संघटनेच्या वतीने कुटुंबासहित सत्कार करण्यात आला. तसेच केंद्रीय सशस्त्र राखीव दलात निवड झालेल्या पवन दांडेकर यांचा तसेच प्रगतिशील शेतकरी  किशोरजी बारेकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.


 पाहुण्यांच्या मनोगतामध्ये कळमगावच्या सरपंच सुषमाताई धरणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. तसेच या कार्यक्रमात वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते कार्तिक शेंडे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष धीरज दांडेकर तर आभार विवेकानंद चौके यांनी मानले.या समारंभाला गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !