बेंबाळ च्या कुरमार समाजातील पोरांनी केले आगळा वेगळा उपक्रम...!! ★ “ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा २९८ वी जन्मोत्सव उत्साहात साजरी ” व “ मेंढ्यांना आंत्रविषार रोग प्रतिबंधक लसीकरण शिबिर ”




बेंबाळ च्या कुरमार समाजातील पोरांनी केले आगळा वेगळा उपक्रम...!!

★ “ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा २९८ वी जन्मोत्सव उत्साहात साजरी ” व “ मेंढ्यांना आंत्रविषार रोग प्रतिबंधक लसीकरण शिबिर


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


मुल : 31 मे 2023 रोजी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती” या निमित्याने बेंबाळ गावातील कुरमार समाज व  जय मल्हार युवा सेना यांचे कडून जंयतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये त्यांनी सकाळी ८.००.वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला मालाअर्पण करुन  ध्वजारोहण  केले आणि लगेच कुरमार समाजातील उपजीविका असणार्या शेळ्या- मेंढयाना लसीकरण करण्याल आले त्यामध्ये डॉ.भुसारी साहेब,पशुसंवर्धन अधिकारी मुल त्याच्या मदतीने ते लसीकरण करण्यात आले. 

महत्वाचा म्हणजे,जयंती सर्वच करतात पण कुरमार समाजातील पोरांनी काही वेगळाच केला. त्यांनी सांयकाळी रॅली व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजन केले.सायंकाळी  7:00 वाजता रॅली काढली त्या रॅलीमध्ये त्यांनी समोर सर्व महापुरुषांचे वेशभुषा करण्यात आली,त्यांचा उद्देश हा होता की सर्वधर्मसमभाव आहे.त्यानंतर त्यांनी रॅली संपल्यानंतर प्रबोधनाचा कार्यक्रमास सुरुवात केले. 

सर्वप्रथम सर्व महापुरुषांच्या विचारांवर एक छोटीसी लघु नाटीका सादर केले.

यासाठी की आता लोकांना ऐकण्यापेक्षा बघालया आवडत हीच नाळ पकडून कुरमार समाजातील पोरांनी एक छोटासा उपक्रम राबविला.ही सर्व जाती-पाती विखुरलेले आहोत तर आपण ही भावना जोपासली पाहिजे हा एक कुरमार समाजातील पोरांचा उद्देश होता.

त्यानंतर अहिल्यादेवीच्या जीवन चरित्रावर एक नृत्य सादर करण्यात आले.त्या नंतर प्रबोधनाच्या कार्यक्रमाला सुरुवात केले.

त्यामध्ये  पुसद येतील बहुजन विचारवंत आणि महाराष्ट्र व भारतभर बहुजन महापुरुषांचे विचार समाजत रुजविनारे व त्यांच्या विचारांचा प्रसार समाजात करनारे,सन २००० पासुन सामाजिक चळवळ कार्यक्रते मुख्य वक्ते आदरणीय डॉ.समीर कदम सर,कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. श्यामराव कंकलवार अध्यक्ष कुरमार समाज बेंबाळ,उद्धघाटक मा.श्री.चांगदेव भाऊ केमेकार सरपंच बेंबाळ सहउद्धघाटक मा.श्री.चंदुभाऊ मारगोनवार माजी सभापती पंचायत समिती मूल प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा.श्री.देवाजी ध्यानबोईवार उपसरपंच बेंबाळ तसेच ग्रा.पं.कमेटी, तंटामुक्तीमती अध्यक्ष.आणि सर्व समाजाचे अध्यक्ष उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.राहुल ताईबाई दिवाकर डंकरवार यांनी केले.तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. आशिष लिला सोमाजी करेवार यांनी सांभाळले आणि आभार प्रदर्शन कु.मुकेश सुनिता येल्लाजी अल्लीवार यांनी आभार मानले.तर हा कार्यक्रम सर्व "जय मल्हार युवा सेना" बेंबाळ यांच्या मदतीने पार पडला.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !