मुलांनो गाडी चालवितांना मोबाईल वर जरा कमी बोला.आणि हिरोगीरी जरा कमी करा.
गाडी चालविणारे अल्पवयीन मुलांवर कठोर कार्रवाई करा.
दुसरेंना जीवन जगायचे आहे हे लक्षात ठेवा. - कल्याणी भुरे
नरेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी,भंडारा
भंडारा : काल साकोली येथे कार्यक्रमाला जात असतांना देव्हाडी पुला जवळ काही मुली तुमसर येथुन क्लास करून येत असतांना सायकल वरील मुलींना बाईक वरील मुलांनी त्या मुलींना जोरदार धडक दिली.
गाडीतुन जात असतांना हा प्रकार बघुन राहवले नाही खाली उतरून मुलींची विचारपुच करून त्यांना सर्वोपरि मदतीची हिंमत दिली.आणि या हिरोगीरी करणारे मुलांना चांगलीच दमदाटी दिली... की या पुढे गाडी चालवितांना मोबाईल वर जरा कमी बोला... समोरून येणारेंचा जिवाचा विचार करा.
माझी पोलीस डिपार्टमेंटला सक्तीचे सांगणे आहे की अशा मुलां वर गाडी चालविण्याचे आरोप लागले असतील तर त्यांचे लाइंसस वापस घेऊन आई वडिलांना पोलीस स्टेशनला बोलावुन त्यांच्या समक्ष हिरोगीरी वर चांगलेच सबक द्यावेत सोबत उज्जवलाताई मेश्राम आणि वेदांता गंगभोज होते