संयुक्त राष्ट्रसंघाचे वतीने १८ वि धम्मपरिषद थायलंड येथे संपन्न. ★ चंद्रपूर जिल्ह्यातून सामाजिक कार्यकर्ते गोपाल रायपुरे यांचा सहभाग.

संयुक्त राष्ट्रसंघाचे वतीने १८ वि धम्मपरिषद थायलंड येथे संपन्न.


चंद्रपूर जिल्ह्यातून सामाजिक कार्यकर्ते,गोपाल रायपुरे यांचा सहभाग.


विजय नरचुलवार - प्रतिनिधी


व्याहाड खुर्द : संयुक्त राष्ट्र संघाचे वतीने १८ वि धम्मपरिषद तथा १८ वा संयुक्त राष्ट्रीय दिन २०२३ चे आयोजन थायलंड येथील महाचुलॉग कोमराज विद्यालय युनिवर्सिटी आयुथाया, संयुक्त राष्ट्रसंघ कॉन्फरन्स सेंटर बँकॉक, बुद्धा मॉन्थन नॉकान पथाम थायलंड येथे १ जून ते २ जून २०२३ या दोन दिवसीय आयोजित धम्मपरिषद संपन्न झाले. 


संयुक्त राष्ट्रसंघाशी संलग्न, जगातील सर्व बौद्ध राष्ट्र व संलग्न संघटनांनी एकत्र येऊन १८ वि धम्म परिषद थायलंड येथे दोन दिवसीय आयोजित करण्यात आली होती. तर ज्यामध्ये ५२ देशातील १००० हून अधिक सहभागींनी भाग घेतला होता. त्याचे उद्घाटन मा. प्रो. डॉ. फ्रा. ब्रम्ह्पंडीत अध्यक्ष तथा धम्म संघनायक इंटरनॅशनल कॉन्सिल डे ऑफ वेसाक यांचे हस्ते तर श्रीलंकेचे पंतप्रधान मा. ना. दिनेश गुणवर्धन यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. 


सदर हि परिषद वैशाख बुद्ध पौर्णिमा हा जगभरातील बौद्ध अनुयायांसाठी वर्षातील सर्वात पवित्र दिवस आहे कारण तो भगवान बुद्धांच्या जीवनातील तीन मुख्य घटना दर्शवितो - जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण. त्यामुळे जगात बौद्ध धर्माची उत्पत्ती झाल्यापासून या दिवसाला विशेष महत्व दिल्या जात आहे.


 आज जागतिक पातळीवर विविध जाती धर्मात सामाजीकात्मक राजकीय दृष्टीकोनातून होत असलेली हुकुमशाही, हिंसा, अन्याय, अत्याचार, सत्ता परिवर्तन हल्ले, दहशतवाद, आतंकवाद हे अघ्रुत्य कृत्य दिवसेदिवस वाढत जात आहे. त्यासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय एकता, सौहार्द आणि जागतिक शांततेसाठी बुद्धांची शिकवण, शांती, अहिंसा आणि सत्याचा मार्ग अवलंबिणे हे काळाची गरज आहे. या उद्दिष्टाने दोन दिवसीय संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने जागतिक बौद्ध धम्म परिषदेत चार चर्चासत्र, एक खुले चर्चा सत्र, व दोन परिसंवाद व बौद्ध सांस्कृतिक महोत्सव वेसाक कार्यक्रम इत्यादी आयोजन करण्यात आले होते.


भारत देशातून गगन मलिक फाउंडेशन भारत, नवी दिल्ली या संघटनेला संयुक्त राष्ट्रसंघाचे कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली. या संस्थेच्या एकूण १०० प्रतिनिधीचा सहभाग घेण्याची संधी मिळाली. या संठेच्या मार्फत भारतीय बौद्ध प्रतिनिधी म्हणून भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले,भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, 


गगन मलिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष धम्मदूत अभिनेते गगन मलिक,कार्याध्यक्ष, नितीनजी गजभिये नागपूर, सिद्धार्थ हत्तीअंभीरे बुलढाणा, मोहनराव वाकोडे मध्यप्रदेश, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोपाल रायपुरे चंद्रपूर,विकास तीवाडे,राजू झाडे,भीमराव फुसे, स्मिता वाकडे,भन्ते राजरतन, भन्ते करुणाबोधी, प्रमोद पवार असे महाराष्ट्रातील एकूण ३५ प्रतिनिधी सहभागी झाले. सदर परिषदेत खुल्या चर्चा सत्रामध्ये भारतीय प्रतिनिधी म्हणून रामदासजी आठवले व भीमराव आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध धम्मा विषयी विचार व्यक्त केले.


या संयुक्त राष्ट्रसंघाचे वतीने जागतिक धम्म परिषदे करीता थायलंड,श्रीलंका,भारत,फ्रान्स,ऑस्ट्रेलिया, यु.एस.ए.कोरिया,म्यानमार,चिन,व्हीएतनाम, मलेशिया,इत्यादीसह वेगवेगळ्या चर्चा सत्रात भिक्षु (भन्ते), प्रमुख प्रोफेसर वक्ते सहभागी होऊन मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रम थायलंड देशाचे प्रभारी पंतप्रधान प्रो.विष्णू कृआ नगम यांचे अध्यक्षते खाली समारोपीय करण्यात आला. 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !