विभागिय समन्वयक प्रा.डॉ.संजयकुमार निंबेकर यांचा सत्कार

विभागिय समन्वयक  प्रा.डॉ.संजयकुमार निंबेकर यांचा सत्कार


नरेंद्र  मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी,भंडारा


भंडारा : विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने रघुनाथ शेंडे यांच्या नेतृत्वात प्रा.डॉ.रमेश पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय सोनटक्के यांचे नियोजनामध्ये 6 जून ते 11 जून या कालावधीत संवाद यात्रा नागपूर वरून निघाली विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली,वर्धा,यवतमाळ अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातून संवाद साधत शेवटी नागपूर येथील नेहरू महाविद्यालय सक्कदरा चौक करण्यात आला.


 समारोपीय कार्यक्रमाला रघुनाथ शेंडे केंद्रीय अध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.श्रीरामजी कावळे प्र-कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली डॉ. प्राचार्य सुनील साकूरे गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली डॉ.सतीश चाफले महामंत्री शिक्षक मंच नागपूर तसेच प्रा. डॉ. नामदेव हटवार सरचिटणीस विदर्भ तेली समाज महासंघ नागपूर यांच्या उपस्थितीत प्रा.डॉ. संजयकुमार निंबेकर यांचा सत्कार करण्यात आला.


पालांदूर लाखनी परिसरामध्ये सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक उपक्रमामध्ये सहभाग घेणारे प्रा.डॉ,संजयकुमार निंबेकर हे श्री संताजी कला व विज्ञान महाविदयालय,पालांदूर येथे मराठी  विभागामध्ये कार्यरत असून.राष्ट्रीय सेवा योजना विभागीय  समन्वयक आहेत. यांचे संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतर भारतीय भाषा प्राधिकरणावर निवड झाल्याबद्दल यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी नागपूर विद्यापीठातील संशोधक प्राध्यापक आणि समाज बांधव उपस्थित होते 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !