महाराजस्व अभियानातंर्गत शासन आपल्या दारी आलाय. - माजी मंत्री विजय वडेट्टीवार
★ महाराजस्व अभियान - हळदा येथे शुभारंभ.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,१०/०६/२३ जाऊन प्रश्न सोडवित सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली नागरिकांना मिळावा यासाठी शासन आपल्यापर्यंत आले आहे. विविध शासकीय कामांसाठी तालुका मुख्यालयी आपली होणारी पायपीट थांबली पाहिजे या हेतूने महाराजस्व अभियानातंर्गत शासन आपल्या दारी आला आहे याचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.ते ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथे महसूल विभागाच्या वतीने आयोजित महाराजस्व अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रम्हपुरीचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्के हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार उषा चौधरी, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर,माजी जि.प.सदस्य डॉ.राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर,नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, संवर्ग विकास अधिकारी पुरी, सहाय्यक गटविकास अधिकारी रविंद्र घुबडे, बाजार समितीचे संचालक उमेश धोटे, बाजार समितीचे संचालक किशोर राऊत, बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर झरकर, रुपेश बानबले, छत्रपती सुरपाम, सचिन बदन यांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, ब्रम्हपुरी तालुका मुख्यालयापासुन सुमारे 45 किमी अंतरावर असलेल्या हळदा गावासह या परिसरातील अनेक गावे जंगलव्याप्त भागात असल्याने या परिसरातील नागरिक हे वाघाच्या दहशतीखाली जीवन जगत असतात. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने लहानमोठ्या शासकीय कामांसाठी तालुका मुख्यालयी ये-जा करणे नागरिकांना त्रासदायक ठरत असते. त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये या उद्देशाने सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
आता नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी तारांबळ उडु नये म्हणून स्थानिक प्रशासनातील ग्रामसेवक, तलाठी हे ठरलेल्या दिवशी आपल्या कार्यालयात हजर राहतील यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी असे सुध्दा यावेळी सांगितले.
गरीबांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. गरीबांची कामे केल्याने त्यांच्या कडून मिळणारा आशिर्वाद हा अनमोल असतो. गरीब माणसाची समस्या प्राधान्याने प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोडवाव्यात असेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे यांनी देखील महाराजस्व अभियानाच्या अनुषंगाने नागरिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वनविभागाच्या वतीने पाणी गरम करण्यासाठी 297 लाभार्थ्यांना बंबचे वितरण करण्यात आले.पंचायत समिती घरकुल विभागाच्या वतीने लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र, अन्न पुरवठा विभागाच्या वतीने नवीन रेशनकार्ड वितरण देखील यावेळी आमदार,विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले.