महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी च्या वतीने जिल्हा परिषद गडचिरोली समोर साखळी उपोषण सुरु.
एस.के.24 तास
गडचिरोली : ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी काढलेल्या परिपत्रकामध्ये कोणताही शासन निर्णय नसताना, मागील जाहिरातीचा विचार न करता, हंगामी क्षेत्र कर्मचारी यांना आरोग्य सेवक भरतीमध्ये 50 % कोट्यामध्ये 90 दिवसांचे अनुभव प्रमाणपत्र आवश्यक असे नमूद करण्या ऐवजी 90 दिवसांचे अनुभव प्रमाणपत्र धारकाना प्राधान्य असे नमूद केल्याने बऱ्याच वर्षापासुन राखीव असलेल्या जागावर असलेला हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांचा अधिकार संपुष्टात आला आहे हा सरळ सरळ हंगामी क्षेत्र कर्मचारी यांच्यावर शासनाने अन्याय केला आहे.
हा आमच्यावर अन्याय आहे,आणि जोपर्यंत या परिपत्रकामध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील.असे संघटनेचे अध्यक्ष श्री ज्ञानदीप गलबले, उपाध्यक्ष श्री विलास ढोरे,श्री सुनील तागडे,श्री,ठुमराज कुकडकार, श्री चेतन जेंगटे, यांनी सांगितले. यावेळी राजेश धूपम,वैभव कोटांगले,शामराव सुनतकर,अक्षय नैतान, स्वप्नील बांबोळे,कुणाल रायपुरे,मुरलीधर कासेट्टी, वसंत डेब्बा,शंकर कोंडागुरले,प्रदीप दुर्गे,राकेश जुमन्नाके,आशिष कोटगले,संदीप जुमळे,कृष्णा वैरागडे इत्यादी उपोषणकर्ते उपस्थित होते.