प्रा.अतुलभाऊ देशकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भोई समाजाचे नेते बाळकृष्ण साखरे यांचा भाजपात प्रवेश.
★ मध्य प्रदेशचे मंत्री डॉ.अरविंद सिंह भदौरिया यांचे हस्ते पक्षामध्ये प्रवेश.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,११/०६/२३ भारतीय जनता पार्टी ब्रह्मपुरी ची मोदी @ 9 महा जनसंपर्क अभियानांतर्गत ब्रह्मपुरी येथील गोसेखुर्द विश्रामगृहात प्रमुख पदाधिकारी तथापक्ष कार्यकर्त्यांची बैठक दिनांक ०९ जून ला संपन्न झाली. या बैठकीला मध्यप्रदेशचे मंत्री डॉ.अरविंद सिंह भदौरिया हे होते.
तर प्रमुख उपस्थिती राज्यसभा सांसद रामभाई मोकाडिया गुजरात, धर्मपाल मेश्राम प्रदेश उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश,खासदार रामदासजी तडस,खासदार अशोक भाऊ नेते, जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा निवडणूक प्रमुख किसनजी नागदेवे.माजी आमदार अतुल भाऊ देशकर,ज्येष्ठ नेते प्रा.कादर शेख,तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, शहराध्यक्ष इंजि.अरविंद नंदुरकर,भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रा.रामलाल दोनाडकर इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पद्मापूर येथील माजी ग्रा.पं.सदस्य तथा भोई समाजाचे जेष्ठ नेते बाळकृष्ण साखरे यांनी पक्षात प्रवेश केला.मंत्री भदौरिया यांनी भाजपाचा दुपट्टा त्यांच्या खांद्यावर घालून पक्षप्रवेश करून घेतल्याची जाहीर केले.प्रा.अतुल भाऊ देशकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश करीत असल्याचे श्री साखरे यांनी जाहीर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी केले. संचालन मनोज भुपाल जिल्हा महामंत्री भाजपा ओबीसी मोर्चा तथा महामंत्री भाजपा ब्रह्मपुरी. तर आभार प्राचार्य सुयोग बाळबुद्धे शहराध्यक्ष भाजयुमो ब्रह्मपुरी यांनी मानले.यावेळी भाजपाचे अनेक पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.