विश्वासू प्रवाशी संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत डांगे तर उपाध्यक्ष प्रा.विजय मुळे सचिव विश्वास मेश्राम.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०६/०६/२३ महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत प्रवाशाच्या समस्या आणि तक्रारी संबंधी सूचना यासाठी प्रत्येक आगारात विश्वासू प्रवाशी संघटनेची संकल्पना कार्यान्वित केली. त्यानुसार नागरिकांच्या ,प्रवाशांच्या समस्या तक्रारी सूचना मांडण्यासाठी ब्रम्हपुरी आगारातील समस्त प्रवाशांच्या समस्या, तक्रार, सूचना शासन स्थरा पर्यंत पोहचविण्यासाठी विश्वासू प्रवाशी संघटना स्थापन करण्यात आली.या संघटनेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार प्रशांत डांगे यांची निवड करण्यात आली.
तर उपाध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार प्रा.विजय मुळे यांची निवड करण्यात आली. सचिव पदी विश्वास मेश्राम तर सदस्य म्हणून पत्रकार दत्तात्रय दलाल,पत्रकार प्रविण मेश्राम,आशिष राठोड,प्रा.सरोज शिंगाडे यांची निवड झाल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभाग गडचिरोली, आगार ब्रम्हपुरी प्रशासन शाखा चे आगार व्यवस्थापक नितीन झाडे यांच्या वतीने देण्यात आले.त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केल्या जात आहे.