विकासविद्यालय,अ-हेरनवरगाव विद्यालयाचा निकाल 91.93% कु.मोनाली वैद्य विद्यालयातून प्रथम.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,०४/०६/२३ नुकताच माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल घोषित झाला.यामध्ये विकास विद्यालय, अ-हेरनवरगाव या शाळेने आपली उत्कृष्ट निकाल देण्याची पंरपरा कायम राखत यावर्षी सुध्दा 91.93 टक्के निकाल दिला आहे. याध्ये प्राविण्य श्रेणीत 4,प्रथम श्रेणीत 32,व्दितिय श्रेणीत 19 तर पास श्रेणीत 2 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .
त्यामध्ये कु. मोनाली विलास वैद्य 79.60 टक्के ,समिर शिवदास खोब्रागडे 77.80 टक्के,कु स्वाती राजेन्द्र ठेंगरे 76.60 टक्के गुण मिळवून अनुःक्रमे प्रथम,व्दितिय आणि तृतिय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
ह्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अभिनंदनाचा सत्कार सोहळा विकास शिक्षण संस्थेचे सचिव मान. सतिश ठेंगरे साहेब यांचे प्रमुख उपस्थितित घेण्यात आला. याप्रसंगी तिन्ही गुणवंत विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना पुष्प देवून अभिनंदन करण्यात आले व त्याचे पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करून विद्यालयाचे वतिने श्री.एम.बी.धोटे मुख्याध्यापक यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी विद्यालयाचे शिक्षक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.