ग्रामविकास विभाग जिल्हा परिषदेतील गट क संवर्गाची रिक्त पदे भरण्याबाबत सुधारित सूचना परिशिष्ट (ब) अ. क.3 मध्ये तात्काळ सुधारणाकरण्यात यावी.

ग्रामविकास विभाग जिल्हा परिषदेतील गट क संवर्गाची रिक्त पदे भरण्याबाबत सुधारित सूचना  परिशिष्ट (ब) अ. क.3 मध्ये तात्काळ सुधारणाकरण्यात यावी.


एस.के.24 तास


गडचिरोली : ग्राम विकास विभाग मुंबई यांनी काढण्यात आलेले परिपत्रकामध्ये कोणत्याही शासन निर्णय नसतांना मागील जाहिरातीचा विचार न करता, राज्यातील हंगामी फवारणी कर्मचारी विचलीत करणारा एक विशेष पाय म्हणून सन 2019 च्या जाहिरातीप्रमाणे शैक्षणिक पात्रता ठेवण्याचा शासन निर्णय असतांना राज्यातील हंगामी फवारणी कर्मचारी यांना 50% कोट्यामध्ये प्राधान्य असा उल्लेख केलेला आहे. जे की, आतापर्यंत झालेल्या आरोग्य सेवक पदाच्या संपूर्ण जाहीरातीमध्ये हंगामी फवारणी कर्मचारी म्हणून 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हे आवश्यक असा उल्लेख राहत होता. सदरील विभागाची अशी कृती, राज्यातील हंगामी फवारणी कर्मचारी यांना शासकीय सेवेपासून वंचित ठेवण्याचे धोरण आहे की, काय ? अशी धारणा झालेली आहे.


सदरील विषयाबाबत दि. 23-05/2023 ला निवेदन देऊन सुद्धा कोणतीही कार्यवाही झालेली नाही करीता महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण राज्य हंगामी क्षेत्र/ फवारणी कर्मचारी हे आपापल्या जिल्हयातील रोच जिल्हा परिषद कार्यालय समोर एकाच दिवशी दिनांक 07 जुन 2023 पासून उपोषण करणार आहेत यात आम्ही महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटना सुध्दा जिल्हा परिषद गडचिरोली कार्यालयासमोर 7 जून 2023 पासून साखळी उपोषणास बसणार आहोत.


गडचिरोली जिल्हा हा जंगलाने वेढलेला आहे व अति मागास जिल्हास म्हणून संपूर्ण राज्यात ओळखला जाते. जिल्हयात दरवर्षी मलेरीया चे प्रमाण हे टोकावर पोहचत असते दरवर्षी हजारो रुग्ण मलेरीया मुळे बाधीत होत असतात. यावर आळा बसविण्याकरीता राज्यात विशेष बाब म्हणून हंगामी कर्मचान्यांची नियुक्ती केली जाते जे दरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला फवारणीचे व आर. टी. चे कामे  करण्याकरीता त्यांची नियुक्ती केली जाते. गेली पाच दशके हे कर्मचारी मलेरीया विभागात हंगामी स्वरुपात काम करीत आहेत हे जे काम करीत आहोत त्याचा परिणाम सुध्दा दिसत आहे जे की दरवर्षी वाढत्या सल्लेरीयावर आळा बसत आहे. आम्ही कर्मचारी वर्षानुवर्ष मलेरीया विभागाला हंगामी तत्वावर खेड्यापाळात अतिदुर्गम भागात, दन्याखान्यात दळणाची साधने नसणान्या ठिकाणी सुध्दा पायी जावून पर स्थितीमध्ये जिवाची परवा न करता सेवा देत आहोत.


 म्हणूनच एक विशेष बाब म्हणून आरोग्य विभागातील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या गट क च्या शासकीय पदाकरीता 50% राखीव कोटा दिनांक 19/03/2003 ला अधिसूचना काढून राखीव ठेवण्यात आलेले आहे. तेव्हापासून आतापर्यंत हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचान्यांकरीता बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदाकरीता 50% राखीव कोटा हा देवण्यात येत होता, ज्यात फक्त हंगामी क्षेत्र / फवारणी कर्मचारी म्हणून 90 दिवस काम केल्याचा अनुभव प्रमाणपत्र ज्या उमेदवारांकडे असेल असेच उमेदवार या 50% टक्के राखीव कोट्यामधून अर्ज करु शकत होते. इतरांना या कोट्यामध्ये अर्ज करता येत नव्हते,


सन 2019 ला ग्रामविकास विभाग अंतर्गत आरोग्य विभागातील पदांची जाहीरात निघाली ज्यात बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 50% हे पद सुध्दा होते या जाहीरातीमध्ये उमेदवारांकडून अर्ज सुध्दा भरुन घेण्यात आलेले होते. परंतु पुढे कोविड-19 ची परिस्थिती निर्माण झाली. म्हणुन ही भरती दोन वर्ष पुढे ढकलण्यात आलो. पुढे 2022 मध्ये भरतीचा वेळापत्रक जाहीर झाला परंतु मागील आरोग्य विभागातील भरतीच्या पेपरफुटी मुळे हे वेळापत्रक सुध्दा दोन वेळा रह करण्यात आले. व आता ही भरती पूर्णपणे रद्द करण्यात आली परंतु या लोटलेल्या कालावधी मध्ये बऱ्याचशा गोष्टी घडुन गेलेल्या आहेत. ज्यात बरेचशे उमेदवार हे वयोमर्यादा ओलांडुन गेलेले आहेत व आरोग्य सेवक या पदाकरीता चौ सेवा प्रवेश नियमांमध्ये सुध्दा बदल झाले.


 करीता ब-याचशे उमेदवार हे अपात्र ठरत होते करीता महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाव्दारे दिनांक 21/10/2022 रोजी एक शासन निर्णय काढला ज्यात स्पष्टपणे नमुद केलेले आहे की माहे मार्च 2019 च्या जाहीराती प्रमाणे ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेले/भरलेले आहेत व सच्या वयाधिक्य झाले असल्याने ते परिक्षेस बसण्यास अपात्र होवुन अश्या उमेदवारांचे नुकसान होवु नये याकरीता अशा उमेदवारांचे अर्ज स्विकारुन पुढील फक्त एका परिक्षेस बसण्याकरीता अशा उमेदवारांना वयोमर्यादेत सुट देण्यात येत आहे. तसेच मार्च 2019 च्या जाहीराती प्रमाणे सदर पदाकरीता असलेली शैक्षणिक अर्हता ही पुढील एका परिक्षेकरीता कायम राहील.


असे असतांना देखील दिनांक 15/05/2023 रोजी ग्रामविकास विभागाकडुन सदरील परिक्षेकरीता जाहीरातीचे मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आले आहे. ज्यात बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 50% या करीता असलेली अनुभवाची अट शिथिल करण्यात आली. ज्यात असे नमुद करण्यात आले आहे की, हंगामी क्षेत्र / फवारणी कर्मचारी म्हणून 90 दिवस काम केल्याचे अनुभव असणान्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल, जे की यापूर्वी फक्त हंगामी क्षेत्र / फवारणी कर्मचारी म्हणुन 90 दिवस काम केल्याचे अनुभव असणान्या उमेदवारालाच या पदाकरीता अर्ज करता येत होता परंतु सदरील मार्गदर्शक सूचनेमुळे आमच्यावर खुप मोठा अन्याय झालेला आहे. आम्ही गेली 5 दशके मलेरीया विभागाला अतितटीच्या वेळी आपल्या जिव धोक्यात घालून सेवा देत होती आणि आता सुध्दा देत आहोत. करीता याचे विरोध म्हणुन जिल्हा परिषद कार्यालय गडचिरोलीच्यासमोर दिनांक 07/06/2023 पासून साखळी उपोषणाला बसत आहोत.


तरी आपण लोकशाहीचे चौथे स्थंभ म्हणून मिडीयाला ओळखले जाते करोता आम्ही आपणास विनंती करतो की आमच्यावर झालेला अन्याय आपण आपापल्या वृत्तपत्रामध्ये देवून आमच्यावर झालेल्या अन्यायाला प्रकाश झोतात आणण्याची कृपा करावी.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !