शा.औ.प्र.संस्थेत जी- 20 जनभागीदारी पंधरवडा विविध उपक्रमाने संपन्न. करियर कौन्सिलिंग तसेच १७ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

शा.औ.प्र.संस्थेत जी- 20 जनभागीदारी पंधरवडा विविध उपक्रमाने संपन्न.


करियर कौन्सिलिंग तसेच १७ रक्तदात्यांनी केले रक्तदान.


एस.के.24 तास


चंद्रपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जी २० -  जनभागीदारी पंधरवडा च्या माध्यमातून संस्था परिसरात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. करियर कौन्सिलिंग विषयावर गटनिदेशक नामदेव गेडकर यांनी मार्गदर्शन केले .त्यानंतर सोशल मीडिया चांगले की वाईट या विषयावर घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धेत स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. 

स्वयंरोजगार व उद्योग कसा उभारावा या दृष्टीने चंद्रपूर शहरातील चार  यशस्वी उद्योजकांचे मनोगत असा महत्त्वपूर्ण कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आला .‌यात कांक्रींट टेक्नो चे  इंजि. विजय घटे , बांधकाम व्यावसायिक  संजय झाडे, राजेंद्र गुंडावार  आणि प्लंबिंग क्षेत्रातील निलेश लोणारे  यांनी सुरू केलेला उद्योग, आलेल्या अडचणी, मिळालेले यश  यासंदर्भात उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांसोबत संवाद साधला.


याप्रसंगी पत्रकार प्रभाकर आवारी,रासेयोचे  कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर, गटनिदेशक सौ. सुनिता गभने उपस्थित होते. जी -२०  या विषयाच्या अनुषंगाने घेतल्या गेलेल्या निबंध स्पर्धेत एकूण २४ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.  त्यानंतर चंद्रपूर शहराजवळील उद्योगांना इंडस्ट्रियल व्हिजिट या अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांनी भेटी देऊन उद्योगात चालणारे कामकाज, त्यांचे व्यवस्थापन यासंबंधी अभ्यास केला आहे . प्रधानमंत्री अप्रेंटीशीप मेळावा आयोजित करण्यात आला. त्यात विविध औद्योगिक आस्थापनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. 


त्यात  अंतिम वर्षाला असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या तोंडी मुलाखती , लेखी परीक्षा घेऊन एकूण 29 प्रशिक्षणार्थ्यांची कंपनीसाठी निवड करण्यात आली. दि. १३ जून रोजी योगा प्राणायाम या आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जी २० कार्यशाळा व  इनडोअर खेळाचे सामने  घेण्यात आले . कौशल्यम सभागृहात झालेल्या या उपक्रमात प्राचार्य रवींद्र मेहेंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयोचे कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर, गटनिदेशक सौ. सुनिता गभने,   निदेशक अभय घटे, श्रीकांत माकोडे, प्रज्ञा साव,माधुरी साखरकर, शालिनी चीप्पा ,उज्ज्वल कोठारकर ,अश्विनी माकोडे विजय लाखे ,सचिन भोंगळे, विकास जयपूरकर,  निखिल धोडरे ,जयेंद्र आसुटकर, प्रीतम वरभे,नीतू लोनगाडगे, आदींनी विशेष परिश्रम घेतले. 

 कौशल्यम सभागृहात झालेल्या रक्तदान शिबीरात एकूण १७ व्यक्तींनी उत्स्फूर्त रक्तदान केले. सर्व रक्तदान दात्यांना माजी रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.


 शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी समाजसेवा अधिक्षक रक्तकेंद्र  शा.वैद्य.महाविद्यालय  पंकज पवार यांनी मार्गदर्शन केले तर रासेयोचे च्या वतीने आजवर रक्तदान चळवळीत दिलेल्या विशेष योगदानाबद्दल डॉ. अनंत हजारे यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी रक्त पेढी विभागाचे सहायक तंत्रज्ञ आशिष कांबळे, अरूणा जुमडे , हर्षिता भारती, सुखदेव चांदेकर यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.  सूत्रसंचालन कु. कोमल बावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.रिया पिपरीकर यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !