शासकीय औ.प्र.संस्थेत जी-20 अंतर्गत जनभागीदारी पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन.


शासकीय औ.प्र.संस्थेत जी-20 अंतर्गत जनभागीदारी पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन.


एस.के.24 तास


चंद्रपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जी २० अभियान अंतर्गत जनभागीदारी  पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने मजबूती प्राप्त व्हावी  तसेच आर्थिक प्रोत्साहन मिळावे या दृष्टीने जी- २० मंच निर्माण करण्यात आलेला आहे. आर्थिक गुंतवणूक आणि व्यापार यात विदेशी कंपन्याना  आकर्षित करण्यासाठी जी 20 या व्यासपीठाचा पुरेपूर उपयोग होऊ शकतो. 

पंधरवड्याच्या निमित्ताने रासेयो विभागाच्या वतीने सायकल रॅली   काढण्यात आली.  पहिल्या दिवशी वेबिनार , संस्था परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले तर ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले ‌यावेळी वन व  पर्यावरण मंत्रालय समिती नवी दिल्लीचे सदस्य प्रा. सुरेश चोपणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य रवींद्र मेहेंदळे होते.  गटनिदेशक सुनीता गभने , कार्यक्रम अधिकारी नामदेव गेडकर,बंडोपंत बोढेकर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी प्रा.सुरेश चोपणे  यांनी पर्यावरण, प्रदूषण हवामान आणि चंद्रपूरचे बदलते तापमान  या विषयावर व्याख्यान दिले. 

नवयुवकांनी ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या त्या ठिकाणी वृक्षारोपण केल्याशिवाय पर्याय नाही असे मत मांडून प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने पर्यावरण जागृतीचे काम प्रत्येकाला करावे लागेल असे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंडोपंत बोढेकर यांनी केले.तर आभार नामदेव गेडकर यांनी केले. सूत्रसंचालन कु. कोमल बावरे  यांनी केले‌. जी २०च्या अंतर्गत स्वच्छता अभियान, सायकल रॅली, वृक्षारोपण संपन्न झाले असून आता  रांगोळी स्पर्धा, करिअर कौशींलींग सत्र, वादविवाद स्पर्धा, यशस्वी उद्योजकाचे भाषण, निबंध स्पर्धा,अप्रेंटीशीप मेळावा, योगा प्राणायाम आयोजन,कार्यशाळा,खेळाचे सामने आदी उपक्रम राबविण्यात येईल.


    या अभियानासाठी रमेश रोडे, अभय घटे,  श्रीकांत माकोडे,निखिल धोडरे,सचिन भोंगळे,प्रितम वरभे,जयेंद्र आसूटकर,विजय लाखे,उज्वल कोठारकर आदींनी परिश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !