दिनांक 16 जून रोजी भव्य जन-आक्रोश मोर्चाचे आयोजन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,१०/०६/२३ विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून जातीयवादी गावगुंडांनी नांदेड येथील बोंढार गावातील अक्षय भालेराव अनुसूचित जातीच्या युवकाची निर्गुण हत्या केली.
या घटनेचा निषेध करण्यासाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील समस्त बौद्ध बांधवांच्या वतीने ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर दिनांक १६ जून २३ ला सकाळी १०-३० वाजता भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केल्या गेले आहे.
सदर मोर्चाची बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक या ठिकाणावरून सुरुवात होऊन ती उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शांततेच्या मार्गाने जाऊन अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना त्वरितअटक करून अति जलद कोर्टामध्ये खटला चालवून मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशी देण्याचेनिवेदन देण्यात येणार आहे.
तरी ब्रह्मपुरी तालुक्यातील संपूर्ण बौद्ध बंधू आणि भगिनी यांनी जास्तीत जास्त बहुसंख्येने मोर्चामध्ये सामील होण्याचे आवाहन जन आक्रोश मोर्चाच्या आयोजन समिती तथा सतीश डांगे,प्रशांत डांगे, डॉ.स्निग्धा कांबळे,डॉ.प्रेमलाल मेश्राम, संतोष रामटेके,पद्माकर रामटेके व अन्य पदाधिकारी यांनी केले आहे.