किसान नगर येथे आंतरजातीय विवाहाने बुद्ध जयंती ची सांगता.
सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक
व्याहाड खुर्द : सावली तालुक्यात येनाऱ्या किसान नगर येथे बौद्ध समाजाचे वतीने तथागत गौतम बुद्ध यांचा जयंती महोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. याचे अवचित्य साधून येथील बुद्ध विहारात रुतीक विश्वनाथ मेश्राम व प्रियंका जयेंद्र रंदये या नवयुवकाचा आंतरजातीय विवाह पार पडला.सदर महोत्सवाचे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण बौद्ध समाजाचे अध्यक्ष सुरेश बांबोळे यांचे अध्यक्षतेखाली अभिनेता मुन्ना बिके यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ता गोपाल रायपुरे, उपसरपंच भावना ताई बिके,किशोर बिके, सतीश कलीये,हरदयाल गलगट, विद्यासागर बिके, राजेश्वर गलगट,लोकमत चे सावली तालुका प्रतिनिधी उदय गडकरी,सावली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष,सुरज बोम्मावर,राजकुमार मजोके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्ता गोपाल रायपुरे यांनी सिद्धार्थ गौतम बुद्ध क्षत्रिय होते ते राज घराण्यातील राजपुत्र पण मानवाच्या दुःख मुक्तीचा मार्ग शोधण्याकरिता राजाश्रम वैवाहिक जीवनाचा त्याग करून वनात जाऊन ज्ञान बौध्दित्व प्राप्त केला तेव्हापासून ते बुद्ध झाले.आज १३२ देशात बौद्ध विचाराने मानव उन्नतीचा मार्ग मिडाला.
बुद्धानी वैवाहिक जीवनाचा त्याग केला आणि दुसऱ्याचे वैवाहिक जीवन सुखी व्हावे हा विचार दिला तोच विचार पुढे ठेऊन रुतीक विश्वनाथ मेश्राम व प्रियंका जयेंद्र रंदये या नवयुवकाचा आंतरजातीय विवाह या ठिकाणी पार पाडल्या जात आहे हीच खरी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना आदरांजली आहे असे विचार मांडले.या कार्यक्रमाला बौद्ध समाजाचे महिला पुरुष किसान नगर येथील युवक युवती बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार राहुल रायपुरे यांनी मानले.