न.प.व बांधकाम विभागाने घेतला पुढाकार. ★ ८०० घरवासियांना मिळणार पूरस्थितीपासून दिलासा.

न.प.व बांधकाम विभागाने घेतला पुढाकार.


★ ८०० घरवासियांना मिळणार  पूरस्थितीपासून दिलासा.


राजेंद्र वाढई!उपसंपादक


मुल : गत  वर्षी मूल शहरामधील बराचसा भाग मुसळधार पावसाने पाण्याखाली येऊंन,पूरसदृश  परिस्थिती तयार होऊन शहरातील जवळपास आठशे घरांमध्ये पाणी घुसले व मोठे नुकसान शहरवासियांना सहन करावे लागले.मात्र यवर्षी मूल शहरातील जनतेला व विशेषता वॉर्ड क्रमांक १५,१६,१७ मधील नगरवासियांचा रोष व पाठपुरावा लक्षात घेत न.प.प्रशासन व सा.बा.बाधकाम उपविभाग मूल यांनी एकत्रितपणे नियोजन करून बाहेरून आलेल्या पाण्याचा निचरा दुर्गा मंदिर परिसरातील तलावात होण्यासाठी मूल गडचिरोली महामार्ग फोडून पाईप टाकण्याचे  काम सुरू केल्याने नागरीक आनंदीत  झाले आहेत.

मूल शहरातील महामार्गाचे कडेने जाणाऱ्या गटर लाईनचे दोषपूर्ण  काम व वनविभागाने आपल्या सोईकरीता शहरात घुसविलेला पाण्याचा  लोंढा यामुळे गत पाच वर्षोनंतर जिवघेणी स्थिती शह रात निर्माण जाली होती हे विशेष. ग्रीनसिटी म्हणून संकल्पनेत असलेल्या मूल श हराला पाण्यावर तरंगणारे शहर म्हणून हिणविण्यात आले होते.मुख्याधिकारी म्हणून आलेले श्री.पाटणकर व उपविभागीय अभियंता श्री.वसूले या दोन अधिकाऱ्यांनी शहर वासियांची भावना व निकड लक्षात घेऊन,अनेक तांत्रीक बाबींचा अभ्यास करून,निधीची व्यवस्था करून शेवटी बांधकामास सुरवात केली. 


या अंतगंत शहरातून जाणाऱ्या महामार्गावर तिन ते चार ठिकाणी महामार्ग फोडून मोठया व्यासाचे पाईप टाकण्यात येणार आहेत. यापैकी रेल्वे फाटके समोर महामार्गावर कामाला सुरवात करण्यात आली आहे.


   वनविभागाला सोयरसुतक नाही.?


गत पंचेविस वर्षात शहरातील वॉर्ड न.१५,१६,१७ मध्ये मुसळधार पावसातही कधी घरांमध्ये पाणी घुसले नाही.मात्र गत दोन वषांआधी येथील वनविभागाने नर्सरी चे नावाखाली निचरा होणारा गावाबाहेरची बोडी संपविली व पाण्याचा लोंढा गावात वळविला . यामुळे क्षमतेबाहेर वाहणारे पाणी दोनदा अनेक घरांमध्ये घुसले व शहरवासीयांना भितीच्या छायेत वावरावे लागले,करोडोचे नुकसान झाले.


नगर परिषद्,  सा.बा.विभागाने पुढाकार घेतला  म्हणून यंदा फावले.मात्र वारंवार सुचना,पाठपुरावा  करूनही वनाधिकारी या बाबतीत हसण्यावर नेत असल्याची चिड व्यक्त होत आहे. आपल्या भल्यासाठी शह राला वेठीस धरणाऱ्या वनविभागावर संताप व्यक्त होत आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !