उप जिल्हा रुग्णालय आरमोरी येथे अँड,बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानीमीत्य रुग्णांना फळं वाटप.
सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक
आरमोरी : बहुजन हृदय सम्राट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रिय अध्यक्ष अँड,बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस अर्थात १० मे स्वाभिमानी दिना निमीत्य वंचित बहुजन आघाडी आरमोरीच्या वतिने उप रुग्णालय आरमोरी येथे रुगणाना फळं वाटप करण्यात आले.
तालुक्याच्या व शहराच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे उपक्रम राबवून अँड,बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला,यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा संगटिका प्रज्ञा निमगडे,तालुकाध्यक्ष राजेंद्र गेडाम,तालुका उपाध्यक्ष विकास भैसारे,गणुजी शेडमाके,सदस्य ताराचंद बनसोड, संध्या रामटेके, किरण रामटेके, जयश्री रामटेके, आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अँड,बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व आंबेडकरी चळवळीतील ईतर नेत्यांपेक्षा वेगळे,कणखर व स्वाभिमानी असल्याने यांचा जन्म दिवस म्हणजेच चळवळीचा "स्वाभिमानी दिवस" असल्याने कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने १० मे हा दिवस साजरा करीत असल्याचे महिला आघाडीच्या जिल्हा संगटिका,प्रज्ञा निमगडे यांनी सांगितले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.