भंडारा जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण ( दिशा ) समितीची सभा संपन्न.
नरेंद्र मेश्राम!जि.प्र.भंडारा
भंडारा : ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने राबविल्या जाणाऱ्या केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नरेगा, कृषी, पांदण रस्ता, पंतप्रधान ग्राम सडक, आरोग्य मिशन, जलजिवन मिशन आणि अन्य योजनाचा विस्तृत आढावा घेतला. यावेळी आवश्यक तिथे महत्वाच्या सूचना करून निर्देश दिले. अनेक अधिकारी अर्धवट माहिती घेऊन बैठकीत उपस्थित राहिल्याने त्यांना कर्तव्याची जाणीव करून देत, पुढे तयारीने येण्याचे निर्देश मी दिले. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे व अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी, DRDA चे विवेक बोंद्रे, विनोद बांते, मोहन सूरकर, माधुरी नखाते, भोजराम कापगते, डॉ. शांताराम चाफले, संदीप नंदरधने, प्रकाश कुर्झेकर, सचिन कुंभलकर, नंदू रहांगडाले, नूतन कुर्झेकर, महेंद्र शेंडे, बिसन सयाम, विलास डहारे, गणेश आदे तथा उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.