राजुरा मधील नियमबाह्य रेस्ट्रो बार बंद करा. - सुरज ठाकरे
★ राज्य उत्पादन शुल्क अधिकारी चंद्रपूर यांना कार्यालयाबाहेर निघून स्थळाची प्रत्यक्ष पाहणी न करता बार ची परवानगी देण्याची घाई का झाली ? श्री.सुरज ठाकरे
एस.के.24 तास
राजुरा : सविस्तर वृत्त असे की, मौजा बामनवाडा, ता. राजुरा. जि.चंद्रपूर येथील मिनी (एम आय डी सी) या औद्योगिक क्षेत्रात नियमबाह्य पद्धतीने रेस्टो बार ला परवानगी देण्यात आली. सदर परवानगी देताना या नव्याने सुरू होणाऱ्या बार च्या ५० मीटर अंतरावर छत्रपती शिवाजी आश्रम शाळा ( अनुसूचित जाती) ही अनुसूचित लहान मुलांची शाळा असून वस्तीगृह देखील आहे. भविष्यात या अनुसूचित जातीच्या मुलांवर काय परिणाम होईल याबाबतची कुठल्या व कसल्याही प्रकारची खबरदारी न घेता निश्चितच देवाण-घेवाण आर्थिक व्यवहार करून मा. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर यांनी सदर बार ला परवानगी दिल्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांच्या तक्रारीनंतर ही बाब युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांच्या लक्षात येताच अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे तथा सभोवतालच्या परिसरातील मुलांचे भवितव्य धोक्यात येऊ नये या दृष्टिकोनातून त्यांनी क्षणाचाही विलंब न करिता आज दिनांक:- ०४/०४/२०२३ ला संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे सदर बार ला दिलेली परवानगी तात्काळ रद्द करून मा. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूर यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून सेवामुक्त करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
व यापुढे अधिकाऱ्यांना कुठल्याही बारला परवानगी देण्याआधी जोवर AC केबिन च्या बाहेर जाऊन स्थळाची प्रत्यक्ष पाहणी तथा शहानिशा केली जात नाही तथा सभोवतालच्या नागरिकांची सहमती घेतल्या जात नाही तोवर जिल्ह्यातील कुठल्याही बार ला परवानगी दिल्या जाऊ नये असे ठणकावून सांगितले.
व बामनवाडा येथील रेस्टो बार ची परवानगी तात्काळ रद्द करून परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कायदेशीर कार्यवाही केली न गेल्यास या क्षेत्रात राहणाऱ्या महिला व अनुसूचित जातीच्या शाळकरी मुलांना घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा या वेळेस जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाला दिला आहे.पुढे प्रशासनाच्या कार्यवाहीची प्रतीक्षा.