न्यायिक हक्कासाठी व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकाराचे सावलीत आंदोलन.
★ आज संपूर्ण भारतात होणार आंदोलनं.
सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक
सावली : आज दिनांक,११ मे २०२३ ला संपुर्ण भारतात पत्रकार व त्यांच्या न्यायिक हक्कासाठी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघातर्फे पत्रकारांच्या विविध मागण्या करिता आंदोलन करण्यात येणार असून सावली येथेही तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
समाजातील विविध घटकाच्या समस्याची दखल घेऊन पत्रकार हा त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करीत असतो. सामाजिक समस्याना न्याय देणारा पत्रकाराला मात्र आपल्याला येणाऱ्या समस्या ची दखल मात्र प्रशासनाकडून अजून पर्यंत घेण्यात आली नसल्याने पत्रकारांच्या विविध समस्या कडे प्रशासनाचे लक्ष वेधन्याकरिता व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाने देशभर आज आंदोलन करणार आहेत.
संपूर्ण देशात जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी,यांना तर तहसीलच्या ठिकाणी तहसीलदार कार्यालया समोर ३ तासाचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.सदर धरणे आंदोलन खालील मागण्यासाठी करण्यात येत आहे.
१) पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा.
२) पत्रकारितेत ५ वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावे.
३) वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेली जीएसटीची अट रद्द करावी.
४) पत्रकारांच्या घरांसाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा.
५) कोरोनात जीव गमावलेल्या पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे.
६) शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकां इतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात.
व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना देशातील पत्रकारांच्या हितासाठी आणि न्याय्य हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना असून पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या समस्या निकाली काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे.संपूर्ण देशात पहिल्यांदाच पत्रकारांच्या हितासाठी व्हॉइस ऑफ मीडिया संघांचे संस्थापक अध्यक्ष संदीप जी काडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन होत आहे हे विशेष.