ब्रम्हपुरी जिल्हा निर्मीतीच्या आंदोलनाला अखिल कुणबी समाज मंडळ ब्रम्हपुरीचा जाहीर पाठींबा.

ब्रम्हपुरी जिल्हा निर्मीतीच्या आंदोलनाला अखिल कुणबी समाज मंडळ ब्रम्हपुरीचा जाहीर पाठींबा.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,२९/०५/२३ चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या ब्रम्हपुरी तालुक्याला जिल्हा घोषित करण्यात यावे यासाठी ब्रम्हपुरीकर अनेक वर्षांपासून मागणी करीत आहेत. मात्र राज्य शासनाने सदर मागणीकडे कानाडोळा केल्याने शासनाला जाग आणण्याकरीता ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण कृती समीतीच्या वतीने पुनच्छ मशाल पेटवल्या गेली असुन दि. 2 जुन रोजी आयोजित आंदोलनास अखिल कुणबी समाज मंडळ ब्रम्हपुरी च्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.                                             


 अखिल कुणबी समाज मंडळ ब्रम्हपुरी च्या वतीने स्वागत मंगल कार्यालय ब्रम्हपुरी येथे दि.28/05/2023ला सायंकाळी 5वाजता  बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एकमताने जिल्हा निर्मीतीच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.


    सदर बैठकीला अखिल कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष ऋषीजी राऊत,सचिव अँड. गोविंदराव भेडारकर, प्राचार्य डाँ. देविदास जगनाडे,माजी जी प सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर, नामदेव ठाकूर, फाल्गुन राऊत, डाँ. सतिश दोनाडकर ,नानाजी तुपट,प्रा. कोडापे, निशाणे साहेब,चोले सर, नगरसेवक महेश भर्रे,राजेश पिलारे, प्रा. राकेश तलमले,प्रा.मोतीलाल दर्वे, सरपंच सोनू नाकतोडे, भाऊराव राऊत, सरपंच उमेश धोटे,सुरेश दर्वे,प्रेमलाल धोटे,योगेश मिसार, नेकराज वझाडे,मुनिराज कुथें,मोंटू पिलारे, गोवर्धन दोनाडकर,राहुल भोयर, ओमप्रकाश बगमारे,मनोज वझाडे, विनोद झोडगे,रामकृष्ण चौधरी,प्रा. दुपारे मॅडम,अशोक ठेंगरी,विलास दुपारे, खोकले मॅडम, सौ.आरती भेडारकर,मैद मॅडम व अखिल कुणबी समाज मंडळ ब्रम्हपुरीचे सर्व पदाधिकारी व महिला मंडळ तसेच युवक वर्ग बहुसंख्येने  उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !