ने.हि.महाविद्यालयाचा उत्कृष्ठ निकाल.


ने.हि.महाविद्यालयाचा उत्कृष्ठ निकाल. 


एस.के.24 तास


ब्रम्हपुरी : दिनांक,२५/०५/२३ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या एच.एस.सी परिक्षेत ने.हि. महाविद्यालयाने उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखली आहे. सर्व शाखा मिळून संयुक्तिक निकाल ९८.४५ टक्के इतका आहे.        


शाखानिहाय निकाल - विज्ञान शाखा ९९.२३ टक्के,कला ९५.२१टक्के, व वाणिज्य शाखा ९९.४१ टक्के असा आहे.


विज्ञान शाखेत ऋतुजा कामडी हिने ८९.५ टक्के गुण प्राप्त करून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. रोहिनी हजारे हिने कला शाखेत सर्वोच्च ८८ टक्के गुण प्राप्त केले. कला शाखेतून ती प्रथम क्रमांकावर आहे. वाणिज्य विभागातून खितेश बोरकर याने प्रथम क्रमांक पटकाविण्याचा मान मिळविला आहे. त्याला ८९.१७ टक्के इतके गुण मिळाले आहेत. सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे ने़ हि. भैय्या शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैय्या, प्राचार्य डॉ.धनंजय गहाने, पर्यवेक्षक आनंद भोयर यांनी अभिनंदन केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !