ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समिती गठीत.

ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समिती गठीत.


अमरदीप लोखंडे!सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,२१/०५/२३ गेल्या ४० वर्षापासून ब्रम्हपुरी जिल्हा व्हावा यासाठी सातत्याने  प्रस्थापित सरकारने आणि सत्तेत येणाऱ्या लोकप्रतिनिधीने निव्वळ पोकळ आश्वासने देत ब्रम्हपुरीकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम केले आहे.तसेच आजपर्यंत ब्रम्हपुरी विधानसभेला लाभलेल्या नैराश्यवादी राजकारण्यांमुळे आणि त्यांच्या उदासीन धोरणांमुळे ब्रम्हपुरीकरांना  नेहमी रोषाला सामोरे जावे लागत आहे. ब्रम्हपुरी शहर चंद्रपूर जिल्हा मुख्यालयापासुन सवाशे किलोमीटर दूर व जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेला आहे.असे असले तरीही ब्रम्हपुरी तालुका हा इतर तालुक्याच्या मानाने,भौगोलिक,शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक,क्रीडा,बँक,आरोग्य इत्यादी गोष्टीत ब्रम्हपुरी तालुका अग्रेसर आहे. 

एक जिल्हा होण्याकरिता लागणारे सर्व शासकिय निकष ब्रम्हपुरीच्याच बाजूने आहेत आणि ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही. तरीही जेव्हा जिल्हा निर्मीतीचा मुद्दा एरणीवर येतो तेव्हा आम्हावर अन्यायच होत आहे. त्यामूळे आता ब्रम्हपुरीकरांनी जिल्हा निर्मिती होण्याकरिता चांगलीच कंबर कसली असून जिल्हा घेतल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही अशी मागणी रेटून धरली आहे.


 याकरिता ब्रम्हपुरीत ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समिती गठीत करण्यासाठी आज शासकीय विश्राम गृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले.या बैठकीस सल्लागार समिती, कार्यकारिणी समिती, निमंत्रक  तसेच आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी कोषाध्यक्ष कमिटी स्थापन करण्यात आली.


या बैठकीत शहरातील तसेच तालुक्यातील युवा वर्ग, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी उपस्थिती दर्शविली. या बैठकीत सर्वानुमते तीव्र आंदोलन आणि पुढील भूमिका लवकरच सल्लागार समिती,कार्यकारणी समिती व निमंत्रक समिती जाहीर करून लवकरच ब्रम्हपुरी जिल्हाहोण्यासाठी मोठे जनआंदोलन उभारले जाईल असे ठरले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !