कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र,जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कृषी विज्ञान महाविद्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने. ★ पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळावा.


कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र,जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कृषी विज्ञान महाविद्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने.


★ पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळावा.


एस.के.24 तास


गडचिरोली : दिनांक,२ मे २०२३ पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळावा कृषी विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला.

या मेळाव्याला प्रामुख्याने उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस,मुख्य अतिथी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते, मा.आमदार डॉ. देवरावजी होळी, आमदार मा.कृष्णाजी गजबे,‌ जिल्हाधिकारी मा.संजय मीणा, सहयोगी अधिव्याख्याता कृषी महाविद्यालयाच्या डॉ.माया राऊत, मुख्य कार्य.अधिकारी कुमार आशीर्वाद,सहाय्यक आयुक्त जि.कौ.वि.रोज.योगेश शेंडे, जिल्हाध्यक्ष किसन नागदेवते, जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुरावजी कोहळे,प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चाचे प्रकाश गेडाम, जिल्हा संघटन महामंत्री रविंद्र ओल्लालवार, महामंत्री प्रमोद पिपरे,शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे तसेच शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कंपन्याचे प्रतिनिधी, महामंडळाचे प्रतिनिधी, प्राध्यापक वृंद, व सुशिक्षित बेरोजगार उमेदवार मोठ्या संख्येने प्रामुख्याने उपस्थित होते.

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याला उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी मार्गदर्शन करतांना मानव संसाधनाने युवकांना कसा प्रोत्साहित करुन रोजगार विषयी तरुणांईंना विशेष भर देऊन रोजगार निर्मिती करण्यात येईल.युवकांना रोजगार मिळावा यासाठी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजीं नी कौशल्य विकास रोजगार तयार केला.या माध्यमातून कौशल्य घडविण्यासाठी प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास कसा केल्या जाईल.करिता कौशल्य विकास रोजगार निर्मिती केली.त्यावेळेस मी मुख्यमंत्री असतांना कौशल्य विकास रोजगार मंत्रालयाची निर्मिती केली.या माध्यमातून युवकांना जास्तीत जास्त काम मिळेल हा उद्देश होता. 


आयटीआयच्या वतीने देशांमध्ये, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज आहे.या मधून सुध्दा  युवकांना रोजगार निर्मिती करता येते. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे. गडचिरोली जिल्ह्यात १०-११ इंडस्ट्रीज आलेले आहेत. गडचिरोली मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती असल्याने टाटा सुद्धा‌ या ठिकाणी येऊन पाहणी केली होती.या ठिकाणी सोयी सुविधा नसल्याने त्यांनी पाहणी करून भिलाई येथे  उद्योग( इंडस्ट्रीज)  निर्माण केल. परंतु या गडचिरोली जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. त्या ऐवजी चांगली खनिज संपदा आहे. याचा उपयोग चांगला झाला पाहिजे.


 कोणसरी प्रोजेक्ट च्या इंडस्ट्रीज  मध्ये वीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक केली जाईल.याचा फायदा सुद्धा मोठ्या प्रमाणात युवकांना होईल.तसेच खनिज संपत्तीच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होणारा लोह, खनिज इथेच प्रोसेसिंग होऊन  रोजगार निर्मितीचे काम केले जाईल.सुरजागड लोह प्रोजेक्टचं पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या टप्प्यातील काम लवकरच पूर्ण होईल.


खासदार महोदयांयांनी मला म्हणाले की, स्थानिक युवकांना जास्तीत जास्त प्रमाणात युवकांना रोजगार द्या. त्यानुसारच रोजगारासाठी स्थानिक युवकांनाच प्राधान्य रोजगार दिले जाईल.ज्या युवकांकडे कौशल्य प्राप्त आहे  त्याला मोठ्या प्रमाणात याचा फायदा होईल. त्यासाठी कौशल्य विकास रोजगाराची आवश्यकता आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांनी संधी चा फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्यायाचे पालकमंत्री  देवेंद्रजी फडणवीस यांनी उद्घाटनप्रसंगी केले.


या मेळाव्याला खासदार अशोक नेते यांनी बोलतांना सर्वसामान्यांचे केंद्र व राज्य सरकार संपूर्ण राज्यामध्ये बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी, सर्वसामान्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगाराच्या माध्यमातुन दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य  योजनेमध्ये युवकांचे रोजगार देऊन कौशल्य विकास आणि उद्योजकता विकासासाठी सहभागीना नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देणे,स्टार्ट अप इंडियाच्या माध्यमातुन होतकरू आणि प्रतिभासंपन्न हुशार तरुणांना प्रोत्साहित करणे व उद्योग उभारण्यास बळ देणे.प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही तरुणांमध्ये कौशल्य विकास घडवून युवकांना यशस्वीरित्या कौशल्यविकास प्रशिक्षण देण्यात या रोजगार मेळाव्याला गरजुंनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या मेळाव्याचा लाभ घेतला,


निश्चितच या मेळाव्याच्या निमित्ताने युवकांना रोजगाराची संधी प्राप्त होईल.अशा मेळाव्याचे आयोजन प्रत्येक तालुक्यामध्ये होणे गरजेचे आहे.जेणेकरून युवकांना या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगारांचे उत्कृष्ट मार्गदर्शन युवकांना लाभेल. त्यामुळे  अशा या मेळाव्याचे आयोजन होणे गरजेचे आहे.असे यावेळी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !