देश सेवेनंतरही समाज कार्यात अग्रेसर समाज सेवकाचा सपत्नीक सत्कार.
नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!भंडारा
भंडारा : संसद भवन हल्ला व कारगिल युद्धात शौर्य बजावल्या नंतर सेवानिवृत्त माजी सैनिक वन सेवेत दाखल झाले. वन सेवेत कर्तव्य बजावताना वन तस्करांना चोरीपासुन परावृत्त करून सामाजिक प्रवाहात आणून त्यांचे पाल्यासह इतरही गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे सेवानिवृत्ती नंतरही सामाजिक कार्य अविरतपणे सुरू आहे. याची डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम आणि वंचित बहुजन आघाडीने दखल घेऊन सोमवार(ता.१ मे) रोजी त्यांचे राहते निवास स्थानी जाऊन सपत्नीक सत्कार केला. ह्या सामाजिक कार्यकर्त्यांचे नाव दादू युवराज उर्फ डी. वाय. बडोले असे आहे.
दादू उर्फ डी. वाय. बडोले यांना लहापणापासूनच देश सेवेची आवड असल्याने १८व्या वर्षी सेना दलात दाखल झाले. राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश इत्यादी राज्यात २० वर्षे सेवा देऊन २००२ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांनी संसद भवन हल्ला व कारगिल युद्धात सहभाग घेतला होता. त्यांना सेना दलात उत्कृष्ट कार्याबद्दल ५ पदक देऊन सन्मानित करण्यात आले. ते २००२ ला सेवानिवृत्त झाले.
सेवानिवृत्ती नंतर २००४ ला दादू उर्फ डी. वाय. बडोले वन सेवेत दाखल झाले. त्यांनी वन्य जीव, वन विभाग प्रादेशिक व वन संशोधन केंद्र यात जालना, जळगाव, चिखलदरा, चंद्रपूर, भंडारा इत्यादी जिल्ह्यात सेवा दिली. वन सेवेत असताना वन तस्करांना वन चोरीपासून परावृत्त करण्याचे काम केले. वन तस्करांचे पाल्यासह गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह आर्थिक मदतही केली. जुलै २०२२ मध्ये वन सेवेतून सेवा निवृत्त झाल्या वरही त्यांचे गरिबांना मदतीचे कार्य अविरतपणे सुरूच आहेत.
दादू उर्फ डी. वाय. बडोले यांचे देश व सामाजिक कार्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम आणि वंचित बहुजन आघाडीचे वतीने दखल घेण्यात आली. सोशल फोरम चे जिल्हा महासचिव कैलास गेडाम, ओबीसी आघाडी साकोली तालुका अध्यक्ष सुरेश मेश्राम, वंचित चे डी.जी. रंगारी यांनी सामाजिक कार्यकर्ता डी. वाय. बडोले यांचे निवास स्थानी जाऊन त्यांचा सपत्नीक सत्कार केला व जोमाने सामाजिक कार्य करण्याची सदिच्छा दिली.सत्काराने बडोले कुटुंबीय भारावून गेले होते.