महाराष्ट्र दिन व कामगार दिन ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे साजरा.
सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक
नागभीड : महाराष्ट्र राज्य निर्मितीचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तसेच जगातल्या कामगारांचे महत्व सांगणारा दिवस म्हणजे कामगार दिन संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो या दोन्ही महत्वपूर्ण बाबी लक्षात घेऊन त्याच्या निमित्ताने ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या पूर्वी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे झेंडावंदन केल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय नवेगाव पांडव येथे सरपंच ॲड.शर्मिला रतनकुमार रामटेके यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपसरपंच तथा माजी उपसभापती विजय पंढरीनाथ बोरकुटे यांच्या हस्ते क्षयरोग रूग्णांना फळधान्य व किट वाटप करण्यात आले.अँड शर्मिला रतनकुमार रामटेके यांच्या कडून वाचनालयासाठी महापुरुषांचे फोटो वाटप करण्यात आले.
हया प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना सरपंच शर्मिला रामटेके यांनी विद्यार्थ्यांना जिद्दीने चिकाटीने परिश्रम घेतल्यास, अभ्यास केल्यास, तुमच्या आयुष्यात बदल शक्य असून विद्यार्थी दशेच्या काळात मेहनत घेतल्यास भविष्यातले दिवस सुखाशीन होतील तसेच विद्यार्थी जीवन हे आपल्या जीवनातला महत्त्वपूर्ण भाग आहे अशा प्रकारचे मार्गदर्शन केले तसेच गावात एक वाचनालयाची सुविधा करून दिल्याचे समाधान व्यक्त केले.
ग्रामपंचायत नवेगाव पांडव च्या वाचणालयातील विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा चे पुस्तक वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी नरेद्र क्षीरसागर सौ.मालती केवळ तिजारे, रितेश राजेश्वर पांडव सदस्य ,विजय श्रीराम नवघडे, अतुल दादाजी पांडव,.मनिषा वासनिक मॅडम , मेश्राम मॅडम,कोरानकर सर
डॉ.वंजारी मॅडम,डॉ चिलबुले मॅडम,खोब्रागडे सिस्टर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष नवघडे मॅडम,सदस्य बावने मॅडम,बंशीलाल चुर्हे सर,शारदा ताई वासुदेव नवघडे,मान.दिवाकर नवघडे सर,दादाजी रामगुंडे, पुंडलिक सहारे,नवेगाव पांडव च्या वाचनालयाचे विद्यार्थी आकाश आटमांडे,आशिष मेश्राम,नाजुक कोहपरे, रोहीत पांडव,करकाडे,दादाजी रामगुंडे,अंगणवाडी सेविका पुष्पा ताई मेश्राम, अल्का ताई फुकट, मदतनीस आशाताई मुरकुटे शिल्पा नवघडे, उपस्थित होते.