ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे रमाई स्मृतीदिन तथा जवाहरलाल नेहरू स्मृतीदिनी अभिवादन.

ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे रमाई स्मृतीदिन तथा जवाहरलाल नेहरू स्मृतीदिनी अभिवादन.

        

एस.के.24 तास


नागभीड : मातोश्री रमाबाई आंबेडकर तथा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून नवेगाव पांडव येथे गुरुकुल गुरूदेव सेवा मंडळ व बौद्ध विहार यांना उत्तम दर्जाचे साऊंड सिस्टीम संच देण्यात आले. यासाठी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित सरपंच अँड,शर्मिला रतनकुमार रामटेके,उपसरपंच विजय पंढरीनाथ बोरकुटे ग्रामविकास अधिकारी क्षीरसागर , कल्पना सुरेश नवघडे,मालती केवळ तिजारे,निरंजना शंकर सोनटक्के,देवकन्या पांडव,रितेश राजेश्वर पांडव, बंशिलाल चुर्हे,पांडुरंग रामटेके,मा.ज्ञानेश्वर बोरकुटे,मा. ईश्वर गायधनी,संजय गायधनी,विजय श्रीराम नवघडे, अतुल दादाजी पांडव,धनराज अलोने,सोमेश्वर पांडव आदी मान्यवर उपस्थित होते.

पांडुरंग रामटेके यांनी भारताचे पहीले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी  खूप मोलाची माहिती दिली शुन्यातून भारत कसा निर्माण केला याविषयी सांगितले तसेच रमाई भिमराव आंबेडकर यांच्या बद्दल पण मोलाचं मार्गदर्शन केले.अँड.शर्मिला रतनकुमार रामटेके यांनी  पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यात आणि विद्यमान पंतप्रधान यांच्या कार्यात किती विरोधाभास आहे. सध्यस्थितीत नरेंद्र मोदी देशाला कोणत्या दिशेने नेत आहेत, देशाला कसे उध्वस्त करत आहे, देश अधोगती कडे चालले आहे असे सांगितले.


 त्याचबरोबर रमाई भिमराव आंबेडकर यांच्या बद्दल मनोगत व्यक्त करताना सरपंच शर्मिला रामटेके म्हणाल्या की जर रमाई भिमराव आंबेडकर आणि  सावित्रीमाई फुले जर नसत्या तर आमच्या स्त्रियां गुलामासारखे जगले असते.आम्ही स्त्रियां या भारत भुमीवर नरकयातना भोगत राहिलो असतो.स्रियांना कोणत्याच प्रकारचे स्वातंत्र्य नसते.म्हणून मातोश्री रमाई भिमराव आंबेडकर आणि सावित्रीमाई ज्योतिबा फुले यांचे योगदान स्त्रियांसाठी फार महत्त्वाचे आहे.धनराज अलोने स यांनी संचालन केले तर आभार अतुल पांडव यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !