केसलवाडा येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी.
नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!भंडारा
भंडारा : पवनी तालुक्यातील अड्याळ जवळील केसलवाडा येथे नवबौद्ध जागृती मंडळाच्या वतीने तथागत भगवान गौतम बुध्द यांची 2567 वी जयंती ( बुध्द पौर्णिमा) तथागत बुद्ध विहाराच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवचंद गजभिये हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी ग्रामपंचायत सदस्या कल्पना गजभिये,ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया रामटेके,ICRP दिक्षा चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते प्रतिक रामटेके, हरीश रामटेके,पत्रकार जयेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख अतिथींच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,मातोश्री रमाई आंबेडकर,क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.त्यानंतर पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले.ह्याप्रसंगी सर्वांनी सामूहिक बुद्ध वंदना ग्रहण केली.
बुद्ध जयंती उत्सव सोहळ्याला बौद्ध उपासक,उपासिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन आणि आभार सामाजिक कार्यकर्ते आशिक रामटेके यांनी मानले.