उच्च शिक्षणामुळे भविष्यातील शेकडो पिढ्या बदलतील. - अभय पेंदाम ★ देशातील एकमेव आयएसडीएममध्ये निवड झालेल्या अभय पेंदामचा ब्राईटएज फाउंडेशनतर्फे सन्मान.

उच्च शिक्षणामुळे भविष्यातील शेकडो पिढ्या बदलतील. - अभय पेंदाम


★ देशातील एकमेव आयएसडीएममध्ये निवड झालेल्या अभय पेंदामचा ब्राईटएज फाउंडेशनतर्फे सन्मान.


एस.के.24 तास


चिमुर : विद्यार्थ्यांना विकासात्मक व्यवस्थापन संदर्भात प्रशिक्षित करणाऱ्या नोएडा येथील देशातील एकमेव इंडियन स्कूल ऑफ डेव्हलपमेंट मॅनेजमेंट (आयएसडीएम) संस्थेमध्ये गडचिरोली येथील अभय पेंदाम यांची निवड झालेली आहे. ते तिथे एक वर्षाचे शिक्षण पूर्ण करणार असून त्यांचा ब्राईटएज फाउंडेशनतर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी भविष्यातील शेकडो पिढ्या बदलायच्या असतील तर नामांकित शैक्षणिक संस्थेतील गुणवत्तापूर्ण शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे मत व्यक्त केले.

आयएसडीएम ही विकास व्यवस्थापन क्षेत्रातली भारतातील पहिली शैक्षणिक संस्था असून तिची स्थापना 2016 मध्ये करण्यात आली. विकास व्यवस्थापनाची निर्मिती, तिचे बळकटीकरण आणि स्थापना करण्यासाठी ही संस्था स्थापित करण्यात आलेली आहे. ज्यांना जगात वास्तविक बदल घडवून आणण्याच्या दिशेने काम करायचे आहे. अशा तरुण नेतृत्वाची निर्मिती करण्याचा या संस्थेचा उद्देश आहे. देशभरातील 50 विद्यार्थ्यांमध्ये अभयची निवड झालेली आहे. तो तिथे एक वर्ष विकास व्यवस्थापन या विषयाचे शिक्षण घेणार आहे.


अभयचे प्राथमिक शिक्षण गडचिरोली येथेच पूर्ण झालेले असून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथिल सावित्रीबाई फुले विद्यापीठातुन पूर्ण केले. यादरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. परंतु त्यात यश येत नव्हते नंतर बीड जिल्ह्यामध्ये आयोजित बालग्राम येथील शिबिरामध्ये त्यांनी सहभाग घेतला. 


तिथे त्यांना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स व इंडियन स्कूल ऑफ डेव्हलपमेंट मॅनेजमेंट याविषयी माहिती झाली. या दोन्ही संस्थेची प्रवेश परीक्षा अभयने उत्तीर्ण केलेली आहे. यासाठी त्याचा ब्राईटएज फाउंडेशनच्या वतीने अंकुर मास्टर विनोद जांभुळे, वाल्मीक ननावरे, ननावरे सर, संदीप चौधरी, विलास चौधरी, निखिल राणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


 या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करत असताना त्यांनी उच्च शिक्षणाची गरज, उच्च शिक्षणाचे प्रकार, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, अजीम प्रेमजी युनिव्हर्सिटी, आयआयटी येथील विविध विषय, गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यासाठी नामांकित शैक्षणिक संस्थेची प्रवेश प्रक्रिया, शिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या स्कॉलरशिप फेलोशिप, इत्यादींची सविस्तर माहिती यावेळी त्यांनी मॅजिक विद्यार्थी व अंकुर विद्यार्थी यांना करून दिली.


 मार्गदर्शन कार्यक्रमानंतर त्यांनी मॅजिक अभ्यासिका आणि त्या अंतर्गत चालणारे विविध उपक्रम याविषयी माहिती जाणून घेतली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुर संयोजक विवेक चौके तर प्रास्ताविक ब्राईटएज फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत एकुडे  यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !