चार जणांचा बळी घेणाऱ्या वाघीनीला केले जेरबंद. ★ ५० ट्रॅप कॅमेरे,पाच पिंजरे, शंभर वनकर्मचारी…अखेर वाघीण अडकलीच.!

चार जणांचा बळी घेणाऱ्या वाघीनीला केले जेरबंद.


५० ट्रॅप कॅमेरे,पाच पिंजरे, शंभर वनकर्मचारी…अखेर वाघीण अडकलीच.!


 सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


सावली : परिक्षेत्र- सावली उपक्षेत्र - व्याहाड (खुर्द) नियतक्षेत्र - नवेगांव मौजा - व्याहाड (खुर्द) गट क्रमांक- 114 परिक्षेत्र- सावली, उपक्षेत्र व्याहाड (खुर्द) परिसरामध्ये मानव व वन्यजीव संघर्षात धोकादायक ठरलेल्या वाघास जेरबंद करण्याकरिता मा.डॉ. जितेंद्र रामगावकर,मुख्य वनसंरक्षक चंद्रपुर वनवृत्त चंद्रपुर,मा.प्रशांत खाडे, विभागीय वन अधिकारी, चंद्रपुर वनविभाग चंद्रपुर,मा. निकीता चौरे,सहाय्यक वनसंरक्षक (तेंदु )चंद्रपुर वनविभाग चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली श्री.आदेश शेंडगे,सहाय्यक वनसंरक्षक, चंद्रपुर श्री.राजेंद्र दा.घोरुडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, (अतिरीक्त कार्यभार) तसेच श्री.प्रविण ग.विरुटकर, सावली वनपरिक्षेत्र अधिकारी,यांचे मार्गदर्शणात सातत्याने माहे जानेवारी 2023 ते आजतागायत पर्यंत व्याहाड खुर्द उपक्षेत्रात वाघाला जेरबंद करण्याचे रेस्क्यु कार्यक्रम सुरु होते.व वनविभागातील वन कर्मचारी रात्री दिवस वनक्षेत्रात गस्ती करुन सदर वाघाचा मागोवा घेण्यात येत होते. 

आज दिनांक 27.05.2023 रोजी वरीष्ठ अधिका-यांचे मार्गदर्शणास खालील प्रमाणे कर्मचारी वाघाचा मागोवा घेत असता व्याहाड उपक्षेत्रात गट क्रमांक 114,मौजा व्याहाड (खुर्द) मधील परिसरात मानव व वन्यजीव संघर्षास धोकादायक ठरलेला वाघ (मादी) लोकांचे आज रोजी 1.00 ते 2.30 वाजता निदर्शणास आला त्यानंतर सदर परिसरात वनविभागातील वनकर्मचारी मोक्यावर जावुन जेरबंद करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आले.


 सदर वाघाचे स्थळ लक्षात येताच डॉ.रविकांत खोब्रागडे,पशुधन विकास अधिकारी व त्यांची टिम व श्री.अजय मराठे, (शुटर) RRU टिम चंद्रपुर शुटर,श्री.बि.एम.वनकर, वनपाल,श्री.के.व्ही.डांगे,श्री. डब्ल्यु.एल.कोडापे,वनपाल, मा.सहाय्यक वनसंरक्षक आर.आर.टी.टिम, तसेच सावली वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी व पि.आर.टी. टीम,सदर परिसरामध्ये कार्यरत होते. व दुपारी 1.42.वाजता च्या दरम्यान डॉ.रविकांत खोब्रागडे,यांच्या समक्ष डॉट करुन सदर वाघाला बेशुध्द करुन जेरबंद करण्यात आले.


सावली वन परिसरात घेतला होता चार जणांचा बळी सावली तालुक्यात या वाघिणीने धुमाकूळ घालून आतापर्यंत चार जणांचा बळी घेतला आहे. तालुक्यातील बोरमाळा,चक विरखल आणि वाघोली बुटी या परिसरात धुमाकूळ घालून चार जणांचे बळी घेणाऱ्या वाघिणीला वन विभागाच्या शार्प शुटरनी अखेर जेरबंद केले.सावली शनिवारी दुपारी,1.00 वा. च्या सुमारास वन विभागाला वाघिणीला जेरबंद करण्यात यश आले.


या वाघिणीला लवकरच नागपुरातील गोरेवाडा प्रकल्पात पाठविण्यात येणार आहे.विशेष म्हणजे, या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी ५० ट्रॅप कॅमेरे, पाच पिंजरे आणि शंभर वनकर्मचारी तैनात करण्यात आले होते. सावली तालुक्यात या वाघिणीने धुमाकूळ घालून आतापर्यंत चार जणांचा बळी घेतला आहे.


३० मार्चला बोरमाळा येथील हर्षल काळमेघे हा चार वर्षीय बालक घराशेजारी शौचाला बसला होता.तेव्हाच वाघिणीले त्याला उचलून नेत ठार केले.१८ एप्रिल रोजी चक विरखल येथील,मंदाबाई सिडाम या महिलेवरही हल्ला करून ठार केले.२६ एप्रिल रोजी ममता बोदलकर या वृद्ध महिलेस ठार केले. 


या घटना ताज्या असतानाच उपवन क्षेत्र व्याहाड खुर्द अंतर्गत वाघोलीव येथील प्रेमिला रोहनकर हिच्या वरही वाघाने हल्ला केला.सातत्याने वाघाचे हल्ले वाढत असल्याने संतप्त नागरिकांनी मृतदेह न उचलण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे परिस्थिती चिघळण्याच्या मार्गावर  होती.  


आमदार,विजय वडेट्टीवार यांनी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना इशारा देत ग्रामस्थांनी वाघाला ठार केले. तर त्यांना अटक करू नका असे कडक शब्दात ठणकावले होते. तेव्हापासूनच वाघिणीला जेरबंद करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली. 


उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांच्या नेतृत्वात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे,शुटर मराठे व वन विभागाचे इतर कर्मचारी सातत्याने वाघिणीच्या मार्गावर होते.शनिवारी दुपारी  खोब्रागडे यांनी वाघिणीला सावलीच्या जंगलात बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देऊन बेशुध्द केले.


वाघिणीला सध्या सावली वनपरिक्षेत्र कार्यालयात ठेवण्यात आले आहे. तिथून नागपूरच्या गोरेवाडा प्रकल्पात पाठविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांनी दिली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !