अज्ञात वाहनाचे धडकेत मोटारसायकलस्वार ठार
बारव्हा तई रस्त्यावरील घटना.
बारव्हा तई रस्त्यावरील घटना.
नरेंद्र मेश्राम
भंडारा : वादळी पाऊस संपताच2 मे ला सायंकाळी 7चे सुमारास रिमझिम पावसात गावाचे दिशेने निघालेल्या मोटारसायकल स्वारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मोटार सायकल स्वार इसम जागीच ठार झाल्याची घटना बारव्हा तई रस्त्यावर चुलबंन नदी पुलावर दि. 2/5/23रोजी सायंकाळी 7चे सुमारास घडली. मृतक इसमाचे नाव टिकाराम डोमा बहेकार वय 55 रा. ढिवरखेडा ता. लाखनी जी. भंडारा असे आहे. मृतक इसमाचे बारव्हा जवळ खोलमारा चिकना टोली येथे सिमेंट कुंड्या व खांब वैगरे बनविण्याचा व्यवसाय कित्येक दिवसांपासून सुरु होता. दररोज सकाळी सदर व्यवसायासाठी येऊन सायंकाळी स्वगावी परत जाण्याचा बहेकार यांचा नित्यक्रम होता. घटनेच्या दिवशी सायंकाळी वादळी पाऊस आला.
अशातच रिमझिम पावसात टिकाराम बहेकार हे स्वतःच्या पॅशन प्रो होंडा क्र. Mh36q4470 मोटारसायकलने 7 चे सुमारास ढिवरखेडा या स्वगावी जाण्यास निघाले असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने तई बारव्हा मार्गांवरील पुलावर गाडीला धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. याची माहिती दिघोरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटना स्थळ गाठुन मृतकाचा पंचनामा केला. व अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल केला असून ठाणेदार हेमंत पवार यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास पो. उप. नि. भोजराज भलावी करीत आहेत.