नेवजाबाई भैयांमुळे आम्ही समृध्द झालोत : प्राचार्य डॉ,गहाणे : पुण्यस्मरण कार्यक्रम.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,१५/०५/२३ " नेवजाबाई भैया हितकारिणी संस्थेची स्थापना १९४२ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने कर्मयोगी मदनगोपालजी भैया यांनी केली.आज या संस्थेचा वटवृक्ष झालेला आहे आणि यात हजारो कर्मचारी कार्यरत आहेत.त्यांचे आणि आमचेसुध्दा जीवन नेवजाबाई भैया हितकारिणी संस्थेमुळे समृध्द झालेत "असे भावपूर्ण प्रतिपादन प्राचार्य डॉ डी एच गहाणेंनी केले.ते नेवजाबाई भैया पुण्यस्मरण कार्यक्रमात बोलत होते.
येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात नेवजाबाई भैयांचा पुण्यस्मरण कार्यक्रम घेण्यात आला.सर्वप्रथम प्राचार्य डॉ डी एच गहाणे,कनिष्ठ महाविद्यालय संचालक प्रा विनोद नरड, प्राचार्य डॉ हर्षा कानफाडे यांनी प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.
या नंतर डॉ,सुभाष शेकोकर,डॉ,राजेंद्र डांगे, डॉ रेखा मेश्राम,डॉ,धनराज खानोरकर, डॉ किशोर नाकतोडे, डॉ तात्याजी गेडाम,डॉ मोहन कापगते, डॉ पद्माकर वानखडे,अधीक्षक संगीता ठाकरे,पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर,डॉ मोहन कापगते,डॉ भास्कर लेनगुरे, डॉ रतन मेश्राम, प्रा जयेश हजारे,शशिकांत माडे,रुपेश चामलाटे,रोशन डांगे इ.मान्यवरांनी पुष्पांजली वाहून आपली आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाचे संचालन व आभार डॉ,युवराज मेश्रामांनी केले.यशस्वीतेसाठी समितीचे डॉ,धनराज खानोरकर,प्रा विनोद घोडमारे,प्रा रुपेश वाकोडीकर,जगदिश गुरनुले, रामटेकेंनी मोलाचे सहकार्य केले.