टेंभा येथील युवकाचा अपघातात मृत्यू.



टेंभा येथील युवकाचा अपघातात मृत्यू.


विजय नरचुलवार - प्रतिनिधी गडचिरोली


वडसा : औषधी घेऊन निघालेल्या दुचाकीला भरधाव टेम्पोने समोरासमोर जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील एक जागीच ठार झाला तर अन्य एक जखमी आहे. ही घटना १६ मे रोजी दुपारी सव्वा चार वाजता देसाईगंज तालुक्यातील विहीरगाव मोहटोला रस्त्यावरील शिरपूर फाट्यावर घडली.


पंकज भजभुजे (२९, रा. टेंभा, ता.गडचिरोली) असे मयताचे नाव असून, किरण नागोसे (४५,रा. सावरगाव, ता.धानोरा) हे जखमी आहेत. ते दोघे नात्याने मेहुणे आहेत. किरण यांच्या पत्नीला किडनी स्टोनचा त्रास होता. त्यामुळे ते दोघे दुचाकी (एमएच ३३ एए ७०४५) वरून विसोरो येथे १६ मे रोजी औषध आणण्यासाठी गेले होते. औषध


घेऊन ते गावी परतत होते. यावेळी शिरपूर फाट्यावर दुपारी सव्वा चार वाजता समोरून येणाऱ्या अज्ञात टेम्पोने जोराची धडक दिली,यात दोघेही दुचाकीवरून कोसळले. डोक्याला गंभीर मार लागून रक्तस्राव झाल्याने पंकज यांचा जागीच मृत्यू झाला तर किरण हे जखमी आहेत त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले.


मृत पंकज यांचा मृतदेह देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात पाठविला.उत्तरीय तपासणीनंतर तो नातेवाइकांकडे देण्यात आला.दरम्यान,अपघातानंतर टेम्पोसह चालक पसार झाला. अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार,मोरेश्वर गौरकर तपास करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !