धानोली पोहाचक येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या.
अमरदीप लोखंडे!सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,१९/०५/२३ तालुक्यातील धानोली पोहोचक येथील एका 42 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी बारा वाजताच्या दरम्यान घडली असावी .किसन पटवारी बनकर वय ४२ वर्ष राहणार धानोली पोहा चक असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मृतक इसमाचे नाव आहे.
किसन याला मोठ्या प्रमाणात दारूचे व्यसन जळले होते त्यामुळे तो नेहमी नशेतच असायचा. काही दिवसा अगोदर तो बाहेरगावी कामाला गेला होता व एक दोन दिवसानंतर तो स्व- गावी परतला होता. त्यामुळे त्याचे व्यसन अधिक वाढले होते. त त्याने नैराश्यातून आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.